Gutkha Seized : चारोटी टोलनाक्यावर ५० लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; पाठलाग करून आयशर पकडला

महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनावर अन्न व औषध प्रशासन, पालघर आणि दक्षता पथक, ठाणे विभागाने संयुक्त कारवाई केली.
Gutkha Seized

Gutkha Seized

sakal

Updated on: 

कासा - महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनावर अन्न व औषध प्रशासन, पालघर आणि दक्षता पथक, ठाणे विभागाने संयुक्त कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने पाठलाग करून चारोटी टोलनाक्यावर वाहन पकडले. या कारवाईत सुमारे ५० लाख ५ हजार ६५० रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला. मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनाची किंमत सुमारे २० लाख रुपये असून, माल व वाहनाची एकूण किंमत ७० लाख ५ हजार ६५० रुपये असल्याचे प्रशासनाने सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com