

Locked Inside Flats Over Drainage Dispute by Gram Panchayat Members
Sakal
पालघर : ऐन दिवाळीच्या सणामध्ये ड्रेनेजच्या कारणावरून इमारतीमधील फ्लॅटना थेट कुलूप आणि सील लावून नागरिकांना तब्बल चार पाच तास घरात कोंडल्याचा धक्कादायक प्रकार पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्याच्या कासा ग्रामपंचायती अंतर्गत घडला आहे. कमल गोपाळ प्लाझा असे या इमारतीचे नाव असून ग्रामपंचायतच्या उपसरपंचासह सदस्य वर्गाने दरवाजांना कुलूप लावून नागरिकांना कोंडल्याचा प्रकार समोर आला आहे. कुलूप लावलेल्या फ्लॅटमध्ये महिला आणि त्यांची लहान मुले पाच तास कोंडून ठेवली होती.