
Latest Mokhada News: विधानसभा निवडणुकीचा धुराळा शांत होत नाही तोच, दोनच महिण्याच्या आत, पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. पालघर जिल्हा परिषदेवर महायुतीचे वर्चस्व आहे.
मात्र, विधानसभा निवडणुकीत विक्रमगड मध्ये महायुतीत शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी बंडखोरी केली. तसेच शिवसेना पदाधिकार्यांनी खुलेआम, निकमांचा प्रचार केल्याने महायुतीत तेढ निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातही झाला आहे. आता त्याचे पडसाद आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत ऊमटणार असल्याचे संकेत भाजप पदाधिकार्यांकडुन दिले जात आहे.
.