Palghar Case
Palghar Case
पालघर - पालघरच्या रिलीफ रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धमक्या तसेच मारहाण केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या रुग्णालय राडा प्रकरणात अकरा गोविंदांसह एका कॅमेरामनची जामिनावर सुटका झाली आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुजाता बांदल यांनी मंगळवारी १२ जणांचे जामीन अर्ज मंजूर केले. मात्र, या प्रकरणातील काही प्रमुख आरोपींच्या जामीन अर्जांवरील निर्णय अद्याप बाकी असून त्यामुळे पुढील न्यायालयीन सुनावण्यांकडे लक्ष लागले आहे.