Palghar Loksabha 2024 Result: पालघरमध्ये कसा झाला भाजपचा विजय? वाचा न माहीत असलेली इनसाईड स्टोरी
Palghar Loksabha 2024 Resultsakal

Palghar Loksabha 2024 Result: पालघरमध्ये कसा झाला भाजपचा विजय? वाचा न माहीत असलेली इनसाईड स्टोरी

Loksabha Win News| अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या झालेल्या प्रचार सभेचा फायदा |

Virar News: पालघर मध्ये गेल्या सहा वर्षांपासून भाजपचा ना आमदार ना खासदार असे चित्र असतानाही आज भाजपने पालघरच्यांजागेवर मिळवलेला विजय म्हणजे त्यांनी आयात उमेदवार डावलून कार्यकर्त्याला दिलेली उमेदवारी आणि शेवटच्या टप्प्यात झालेल्या अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या झालेल्या प्रचार सभेचा फायदा भाजपला झाल्याचे आजच्या निकालावरून दिसून येत आहे. ( Palghar Lok Sabha Election Results)

पालघर लोकसभेसाठी सगळ्यात पहिला उमेदवार हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर केला तर त्या नंतर बहुजन विकास आघाडीने पण महायुतीत हि जागा कोण लढवणार याचा तिढा सुटता सुटत नव्हता. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दोन दिवस अगोदर हि जागा भाजपसाठी सोडण्यात आली. (Palghar Lok Sabha Election Results).

त्यावेळी पालघरमधील शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे हाती कमळ घेऊन निवडणूकलढविण्यास उत्सुक होते. परंतु राज्य नेतृत्वाने या ठिकाणी पक्षाचा कर्यकर्ता निवडणुकीला उतरविल्याने त्याचा फायदा भाजपला झाला आहे. आयात उमेदवाराला स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला होता. ऍड. चिंतामण वनगा आणि विष्णू सावरा यांच्या नंतर याठिकाणी भाजपचे मोठे नेतृत्व निर्माण झंझाले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर हि निवडणूक झाली होती. लोसभा मतदार संघात पक्षीय बळ बघायला गेल्यास भाजपकडे एकही आमदार नव्हता.(Palghar Lok Sabha 2024 Election Results)

एक आमदार होता तो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे तर पाच आमदार हे विरोधकांकडे होते. त्यामुळे हि निवडणूक भाजपला पालघरमध्ये उभे राहण्यासाठी तशी सोपी नव्हती. एका बाजूला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे असलेली सहानुभूतीची लाट आणि त्याबरोबरच डहाणू आणि विक्रमगड मधील दोन आमदार यांच्या बरोबर लढत तर दुसर्या बाजूला वसई,नालासोपारा, आणीबाईसार ये तीन मतदार संघावर ज्यांचे वर्चस्व आहे त्या बहुजन विकास आघाडीशी लढत त्यातही पालघर लोकसभा मतदार संघात या ३ मतदार संघात सगळ्यात जास्त मतदार संख्या असल्याने त्याची जुळवाजुळव यातून मार्ग काढत भाजपने सहा वर्षा नंतर पुन्हा पालघरची जागा आपया कडे खेचून घेण्यात यश मिळविले आहे.(Palghar election results)

पालघर मध्ये भाजपची झालेली पीछेहाट आणि आता आलेली निवडणूक यातून कार्रर्र्र्यकर्त्यांना बूस्टर देण्याचे आणि या मतदार संघात कमळ फुलविण्याचेकाम निवडणुकीच्या अंतिम तोपयंत कोणी केले असेल तर ते देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांच्या जाहीर सभेने. वसई मध्ये असलेल्या गुजराथी समुदायाला अमित शहानी हाक दिली तर योगिनी उत्तर भारतीयांना त्याचा फटका बसला तो बहुजन विकास आघाडीला हा पक्ष पुन्हा एकदा निवडणुकीत तिसर्या क्रमांकावर गेला. ()

यातच भाजपला टक्कर देईल असे वाटणार्या बहुजन विकास आघाडीला उद्धव ठाकरे गटाने त्यांच्या विरोधात केलेल्या प्रचाराचाही फटका बसला. बहुजनच उमेदवार निवडून आल्यास तो मोदींना मदत करेल या प्रचाराचा फटका बहुजनच्या मुस्ल्मान मताला बसला आणिफायदा मात्र झाला तो भाजपला , ख्रिचन आणि मुसलमानांची मते भाजपला कधीच मिळत नाहीत ती मते यावेळी उद्धव ठाकरेच्या उमेदवाराला गेली.

Palghar Loksabha 2024 Result: पालघरमध्ये कसा झाला भाजपचा विजय? वाचा न माहीत असलेली इनसाईड स्टोरी
Latest Marathi News Live Update: मुंबईतून हरवलेली चार भावंडे ग्वाल्हेरला सापडली

त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार हा २ क्रमांकावर आलं. तर बविआ ३ नम्बरवर फेकला गेला. वाढवणं बंदरला विरोध करणाऱ्या बंदरपट्टीमधील मच्छीमारांचा उद्धव ठाकरे यांना पाठिंबा होता. तरीही निवडणुकीच्या आदल्या दिवशी अर्थात रात्रीस जो आर्थिक खेळ खेळला गेला त्याचा फायदा हि भाजपच्या उमेदवाराळा झाल्याचे बोलले जात आहे,

नेते गेले मात्र शिवसैनिक ,राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि काँग्रेसने उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कामडीयांना मोलाची साथ दिल्याचे त्यांना मिळालेल्या मता वरून दिसून येते.

बहुजन विकास आघाडीला मात्र येथील मतदारांनी मोठा फटका दिल्याचे बोलले जात. त्यांच्या हक्काच्या वसई, नालासोपारा आणि बोईसर मतदार संघात त्यांना कमी मतदान झाल्याचे दिसून येत आहे. तर आता तरी बहुजनचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी वसई पुढील लोकसभा आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी वसई विरार बाहेर पडून पूर्ण पालघरवर लक्ष केंद्रित केल्यास त्याचा फायदा बहुजन विकास आघाडीला होईल. असे याठिकाणी बोलले जात आहे.

Palghar Loksabha 2024 Result: पालघरमध्ये कसा झाला भाजपचा विजय? वाचा न माहीत असलेली इनसाईड स्टोरी
Maharashtra lok sabha election 2024 result : काकाच ठरले पुतण्यावर वरचढ; अजित पवारांचा प्रयोग फसला?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com