esakal | पालघर साधू हत्या प्रकरण : दोन दिवसांत CID कडून 32 आरोपींना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

पालघर साधू हत्या प्रकरण : दोन दिवसांत CID कडून 32 आरोपींना अटक

16 एप्रिलला मुंबईतील कांदिवलीमधून दोन साधू व त्यांचा चालक असे तिघे  गुजरातच्या दिशेने पायी जात होते.

पालघर साधू हत्या प्रकरण : दोन दिवसांत CID कडून 32 आरोपींना अटक

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई : पालघर येथील साधू हत्येप्रकरणी गेल्या दोन दिवसांत 32 संशयीतांना गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केली आहे. याप्रकरणी तपासात आरोपींचा सहभाग आढळल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जमावाच्या मारहाणीत तीन व्यक्तींचा मृत्यू झाला होता.

गेल्या दोन दिवसांत याप्रकरणी 32 जणांना अटक करण्यात आल्याच्या वृत्ताला सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दुजोरा दिला आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 70 आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्याबाबत 3 नोव्हेंबरला ठाणे सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. याप्रकरणी आतापर्यंत 186 आरोपींना अटक झाली असून त्यात 11 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

महत्त्वाची बातमी : ठाणेकरांच्या स्वतंत्र धरणासाठी शिवसेनेला जाग येईल का? भाजपची खरमरीत टीका 

16 एप्रिलला मुंबईतील कांदिवलीमधून दोन साधू व त्यांचा चालक असे तिघे  गुजरातच्या दिशेने पायी जात होते. चोर समजून जमावाने पालघर नजीक गडचिंचले गावामध्ये निर्घुण हत्या केली. या हत्याकांडाने भारत देश हादरला. याप्रकरणी महाराष्ट्र पोलिस प्रशासनाने तात्काळ कारवाई करत 100 हून अधिक आरोपांना अटक केली आहे. त्यात अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे.

देशात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन 24 मार्चपासून सुरू होता. अशा परिस्थितीमध्ये गडचिंचले मध्ये गावात लहान मुलांचं अपहरण करण्यासाठी काही टोळ्या फिरत असल्याच्या अफवा होत्या. यामधूनचा ही हत्या झाल्याचं सुरूवातीला सांगण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांवरही अकार्यक्षमतेचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार काहींच्या बदल्या तर काही पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. याप्रकरणाचा तपास गृहविभागाने सीआयडीकडे सोपवला होता.

palghar lynching case central investigation department arrested 32 accused

loading image