मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील हॉटेलवर गोळीबार करणारे आरोपी जेरबंद

प्रविण चव्हाण
Thursday, 1 October 2020

 मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील आकाश हॉटेलवरील गोळीबार आणि लूटप्रकरणी अज्ञात 3 आरोपींना पोलिसांनी बोईसर येथून अटक केली. 

मुंबईः  मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील आकाश हॉटेलवरील गोळीबार आणि लूटप्रकरणी अज्ञात 3 आरोपींना पोलिसांनी बोईसर येथून अटक केली. महामार्गावरील धुंदलवाडी अंबोली येथील हॉटेल आकाश येथे बुधवारी रात्री 3 वाजेच्या सुमारास तीन अज्ञातानी हॉटेलवर पाळत ठेवून बंदुकीचा धाक दाखवून 1 लाखांच्यावर लूट केली होती. 

मध्यरात्री  2 वाजेच्या तीन अज्ञात हॉटेलमध्ये जेवण करून झाल्यावर पैसे देण्याचा बहाण्याने हॉटेलवरील मालकाला बंदुकीचा धाक दाखवून गल्ल्यातील 1 लाखांच्या वर रक्कम तिन्ही आरोपीनी मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास लुटली.  त्यानंतर पळून जाताना हॉटेल मालकाने आणि त्यांचा मुलाने विरोध करत त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. हॉटेल मालकाने प्रसंगावधान दाखवत जीव वाचविण्यासाठी मिळेल त्याने आरोपींचा कारवर हल्ला चढवला. आरोपींना विरोध होताच त्यांच्याकडून मालक आणि त्यांचा जीवे ठार मारून पलायन करण्यासाठी बंदुकीतून 3 राउंड गोळीबार झाडण्यात आल्या. मात्र हॉटेल मालक आणि मुलाने गाडीची चावी काढून घेत जोरदार हल्ला चढविल्याने गोळीबार करून तिन्ही आरोपींनी गाडी सोडून पलायन केले.

अधिक वाचाः कल्याणमध्ये अतिधोकादायक इमारतींवर हातोडा, कारवाई करण्याचे आयुक्तांचे आदेश 

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक, उप अधीक्षक डहाणू, तलासरी, कासा, विक्रमगड पोलिस, गुन्हे शाखा पोलिसांनी  घटनास्थळी दाखल होत आरोपींचा शोध सुरू केला होता. आरोपींना तातडीने पकडण्यासाठी ठाणे येथील डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले होते. पोलिसांना मिळालेल्या पुराव्याच्या आधारे कसून तपासाची चक्रे तातडीने फिरवत तिन्ही आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले. पोलिसांकडून होणाऱ्या पुढील तपासात आरोपींकडून जिल्ह्यात किंवा आणखी कुठल्या ठिकाणी गुन्हे केले आहेत का याबाबत खुलासा होण्याची दाट शक्यता आहे.

----------------------

(संपादनः पूजा विचारे)

Palghar mumbai ahmedabad highway hotel Aakash robbed lakhs Accused arrested


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Palghar mumbai ahmedabad highway hotel Aakash robbed lakhs Accused arrested