

कासा : कासा गावातील सूर्या नदीकिनारी असलेल्या स्मशानभूमीत अघोरी विद्या वा जादूटोण्याचे प्रयोग झाल्याचे अवशेष आढळले आहेत. दोन दिवसांपूर्वी रात्री अज्ञात व्यक्तींनी हे विधी केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.