Palghar: पोंढीचा पाडा पुलाला भगदाड; अपघाताची शक्यता

Javhar: परिणामी या भागातील शाळकरी मुलं व रुग्ण यांची परचंड हाल होतील.
Palghar: पोंढीचा पाडा पुलाला भगदाड; अपघाताची शक्यता
Updated on

Javhar: १८ जुलै पासून कोसळणाऱ्या धारेने जव्हार तालुक्यातील झाप मार्ग ते मांगेलवाडा पासून चोथ्याची वाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुरवस्था झाली आहे, दरम्यान पोंढीचा पाडा गावानजीकच्या पुलाला साधारण साडेतीन फूट व्यासाचे भगदाड पडले असून अनेक गावपाड्यांचा संपर्क तुटला आहे, भगदाड मोठे असले तरी पाणी साठते म्हणून अपघाताची शक्यता वाढली आहे.

गेल्या काही वर्ष भरापासून एस आकाराच्या वळणात रस्ता खचला आहे, परंतु त्यावर अद्याप कोणतीही उपाय योजना करण्यात आली नाही . येथील परिस्थिती पाहता या ठिकाणी जर संरक्षण भिंत बांधली नाही , रस्ता खचून या भागातील वाहतूक बंद होईल.परिणामी या भागातील शाळकरी मुलं व रुग्ण यांची परचंड हाल होतील.

Palghar: पोंढीचा पाडा पुलाला भगदाड; अपघाताची शक्यता
Palghar: जव्हार पोलिसांची धडक कारवाई; १२ लाख रुपयांचा गांजा हस्तगत

रात्रीच्या पावसामुळे जव्हार झाप रस्त्यावर असणाऱ्या पौढीचापाडा पुलावर मोठे भगदाड पडले आहे व कालपासून या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी जात असल्यामुळे या भागातील रस्ता बंद झाला आहे यामुळे या भागातील ५ ग्रामपंचायत,१ प्राथमिक आरोग्य केंद्र,८ पथके,२ आश्रम शाळा,३५ जिल्हा परिषद शाळेचे मार्ग बंद झाल्याने शिक्षकाची व विद्यार्थ्याची शिक्षणाचे तीन तेरा झाले आहेत.गेल्या अनेक दशकांपासून ही समस्या असताना लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प आहेत.या आदिवासी जनतेला कोण न्याय देईल? डिजिटल इंडिया कागदावरच राहील की काय? अशी शंका या भागातील वृध्द नागरिक करीत आहेत.

पोंढीचा पाडा पुलाची उंची वाढावी म्हणून गेल्या २५ वर्षांपासून मागणी केली जात आहे, परंतु सरकारी बाबू आणि लोकप्रतिनिधींची नकार घंटा मुळे येथील जनता विकासापासून कोसो दूर राहिली आहे.पायाभूत सुविधेकरिता साधा रस्ता या भागात बनवता येत नाही? खेदाची बाब आहे.

वंदना ठोंबरे, सदस्य, कौलाळे ग्रामपंचायत

Palghar: पोंढीचा पाडा पुलाला भगदाड; अपघाताची शक्यता
Palghar: मोखाडा तालुका डेंग्युच्या विळख्यात, खाजगी दवाखाने हाऊसफुल्ल  

आज दिनांक.२३ जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार,तहसीलदार कार्यालय जव्हार,गटविकास अधिकारी पंचायत समिती, यांना पोंढीचा पाडा येथील पुलाच्या समस्येबाबत निवेदन दिले आहे. तूर्तास पुलाला पडलेले भगदाड त्वरित बुजवून रस्ता रहदारिसाठी खुला करावा, शिवाय, कायमस्वरूपी इलाज म्हणून या पुलाची उंची वाढविण्यासाठी तजवीज करण्यात यावी. अन्यथा जव्हार तालुका बहुजन विकास आघाडी व या भागातील ५ ग्रामपंचायत मधील नागरिक येत्या १५ ऑगस्ट रोजी पौढीचापाडा पुलावर आमरण उपोषण करतील.

एकनाथ दरोडा,अध्यक्ष, जव्हार तालुका. बहुजन विकास आघाडी

Palghar: पोंढीचा पाडा पुलाला भगदाड; अपघाताची शक्यता
Palghar Assembly Election : पालघर मध्ये काँग्रेसचा 4 जगाचा आग्रह; महाविकास आघाडीत जागा वाटपात तिढा निर्माण होणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com