Judicial Custody for 22 Accused Including Kundan Sankhe
Esakal
पालघर : पालघर शहरातील रिलीफ रुग्णालयातील राडा प्रकरणात शुक्रवारी न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला. शिवसेनेचे निलंबित जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्यासह २२ आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुजाता बांदल यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. तपासासाठी आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी पोलिसांची मागणी होती. मात्र, आरोपींच्या वकिलांनी त्यास विरोध केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने २२ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली.