Palghar Case
Palghar Case
पालघर - पालघरच्या रिलीफ रुग्णालयातील राडा प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या २३ आरोपींपैकी सहा जणांच्या जामीन अर्जावरील निर्णय बुधवारीही होऊ शकला नाही. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुजाता बांदल यांच्यासमोर दिवसभर दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद झाला. मात्र काही वकिलांचे म्हणणे पूर्ण न झाल्याने आणि काही महत्त्वाच्या कायदेशीर मुद्द्यांवर अधिक युक्तिवाद अपेक्षित असल्याने न्यायालयाने सुनावणी गुरुवारी सकाळी ११ वाजता पुन्हा ठेवली आहे.