Palghar Hospital Ruckus : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार? एमआरआयला विरोध करणारेच जखमी गोविंदाला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन गेले

MRI Report Becomes Key Evidence in Palghar Hospital Case : पालघरच्या रिलीफ रुग्णालयातील राडा प्रकरणात जखमी गोविंदा केशव ठाकूरच्या एमआरआयमध्ये मणक्याला गंभीर दुखापत आढळली.
Palghar Hospital Ruckus

Palghar Hospital Ruckus

esakal

Updated on

पालघर : पालघरच्या रिलीफ रुग्णालयातील राडा प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. ज्या एमआरआय तपासणीवरून शिवसेना पदाधिकारी आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. त्याच तपासणीत गोविंदा पथकातील केशव ठाकूर याच्या पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे एमआरआयची प्रक्रिया सुरू असतानाच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समूह केंद्रात पोहोचला आणि त्यानंतर ठाकूर याला दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. या नव्या वैद्यकीय नोंदी आणि घटनास्थळाच्या सीसीटीव्ही फुटेजमुळे तपासाला महत्त्वाचे पुरावे मिळाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रुग्णालयातील राड्याप्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची कोंडी वाढण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com