

2.8 magnitude recorded, Kurze area remains epicenter.
Sakal
पालघर : जिल्ह्यात भूकंपाचे सत्र पुन्हा सुरू असून आज (शनिवार) तलासरी तालुक्यात संध्याकाळी साडेसहा दरम्यान २.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू कुरझे परिसरात असल्याची नोंद झाली आहे. केंद्रबिंदूपासून सुमारे पाच किलोमीटरच्या परिघात भूकंपाची नोंद झाल्याने परिसरातील भूकंपाच्या हालचाली पुन्हा चर्चेत आल्या आहेत.