पालघरमधील कोंडी लवकरच फुटणार

पालघर ः अधिकारी, पदाधिकारी व नागरिकांच्या बैठकीत बोलताना पोलिस.
पालघर ः अधिकारी, पदाधिकारी व नागरिकांच्या बैठकीत बोलताना पोलिस.

पालघर ः पालघर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी काही मार्गांवर एकेरी वाहतूक, रिक्षा स्टॅंड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच प्रत्येक स्टॅंडवर फक्त पाच रिक्षा उभ्या करण्यासह बेकायदा रिक्षांवर कारवाई करून त्या हद्दपार करण्यावरही एकमत झाले. याशिवाय बेकायदा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक यांनी बुधवारी (ता.२५) दिला. 

पालघरमधील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी नगरपालिका, पोलिस, रिक्षा चालक-मालक संघ, व्यापारी दुकानदार असोसिएशन, एसटी, रेल्वे अधिकारी आणि नागरिक यांची संयुक्त बैठक आज झाली. बैठकीस नगराध्यक्ष उज्ज्वला काळे, उपनगराध्यक्ष उत्तम घरत, उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक, पोलिस निरीक्षक दशरथ पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते.

नाईक यांनी पालघर शहरातील वाहतूक नकाशाची माहिती दिली. ते म्हणाले, शहरातील काही रस्ते एकेरी असतील, रेल्वे परिसराततील रस्ता खुला करण्यासाठी रेल्वेकडे पाठपुरावा केला जाईल. पालघर रेल्वेस्थानकाजवळ माहीम-केळवे सातपाटीकडे जाणाऱ्या बस थांबतील. पालघर शहरात तीनआसनी आणि सहाआसनी रिक्षांची संख्या वाढत चालली आहे. काही रिक्षा बेकायदा आहेत. परवाने नसणाऱ्या रिक्षांवर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी रिक्षा संघटनांतर्फे करण्यात आली. 

पालघर शहरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. यावर उपाययोजनेसाठी सर्वांचे सहकार्य आवश्‍यक आहे. ठरवलेल्या मार्गांवर ठरल्याप्रमाणे वाहतूक होईल. केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येईल. विनापरवाना, बेकायदा रिक्षांवरही कारवाई केली जाईल. 
विकास नाईक, उपविभागीय पोलिस अधिकारी 

पालघर नगरपालिका आणि पोलिस यांनी वाहतूक कोंडीवर उपाययोजना ठरवली आहे. त्याप्रमाणे वाहतूक सुरू होईल. त्यात अडचणी आल्यास पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. पालघरमधील रस्त्याच्या कडेला बसणारे मासेविक्रेते आणि भाजीविक्रेते यांच्यासाठी पालघर पूर्व भागात व्यवस्था करण्यात येईल. 
सुभाष पाटील, बांधकाम सभापती, पालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com