धोक्याची घंटा ! राज्यात कोरोना बाधित मुलांची संख्या वाढती, लहान मुलांची संख्या 40 हजाराच्या पार

धोक्याची घंटा ! राज्यात कोरोना बाधित मुलांची संख्या वाढती, लहान मुलांची संख्या 40 हजाराच्या पार
Updated on

मुंबई, 17: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात कोरोना बाधितांची संख्या 10 लाखांच्यावर गेली आहे. मात्र, या आकडेवारीनुसार अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यात तब्बल 40 हजारांहून अधिक लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. 0 ते 10 वयोगटातील मुलांचे कोरोना बाधित होण्याचे प्रमाण 3.88 टक्के एवढे आहे. 

वैद्यकीय विक्षण व औषधी द्रव्ये विभाग सार्वजनिक आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या अहवालानुसार, महाराष्ट्रातील 41 हजार 802 लहान मुले-मुली कोरोना बाधित झाले आहेत. जी धोक्याची घंटा आहे असे तद्य डॉक्टरांचे म्हणणे आहे. 

  • सध्या राज्यात 11 लाख 21 हजार 221 कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या आहे
  • 2 लाख 97 हजार 125 ऍक्टिव्ह रुग्ण काल एका दिवसात सापडले आहेत.
  • बरे होणाऱ्यांची संख्याही वाढती असून 7 लाख 92 हजार 832 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.
  • 30 हजार 409 जणांनी आपला जीव गमावला आहे. 

तरुण ही होतात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित-

  • 21 ते 30 वयोगटातील तब्बल 1लाख 85 हजार 508 म्हणजेच 17.23 टक्के,
  • 31 ते 40 वयोगटातील 2 लाख 29 हजार 484 म्हणजेच 21.32 टक्के
  • 41 ते 50 वयोगटातील 1 लाख 91हजार 911 म्हणजेच 17.83% लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

सार्वजनिक आरोग्याच्या अहवालात ही आकडेवारी देण्यात आली आहे. 

दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांनी ही 1 लाखाचा टप्पा पार केला आहे. 51 ते 60 वयोगटातील 1 लाख 70 हजार 910 रुग्ण सापडले आहेत. एकूण रुग्णसंख्येमध्ये हे प्रमाण 15.87 टक्के आहे. 

पुरुषांचे प्रमाण वाढतेच- 

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या अहवालानुसार, एकुण रुग्णसंख्येत पुरुषांचे प्रमाण अधिक असुन ते वाढत आहेत. कोरोना संसर्गात पुरुषांचे प्रमाण 61 तर महिलांचे 39 टक्के आहे. तर, मृतांमध्ये ही पुरुषांचे प्रमाण अधिक असुन 65 टक्के एवढे प्रमाण आहे तर, 35 टक्के महिलांनी आपला जीव गमावला आहे.

दोन वयोगटातील मुले सर्वाधिक कोरोनाबाधित-

दरम्यान, दोन वयोगटातील मुले - मुली सर्वाधिक बाधित असून ही संख्या एक लाखांहून अधिक आहे. त्यामुळे, या दोन्ही वयोगटातील लहान मुलांची बाधित होण्याची संख्या वाढत असल्याकारणाने डॉक्टरांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन तद्य डॉक्टरांकडून करण्यात आले आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा 2.77 टक्के आहे. 

लहान मुलांच्या उपचारात डाॅक्सिसायक्लीनचा वापर नको- 

कोरोना बाधित लहान रुग्णांच्या वापरात डाॅक्सिसायक्लीनचा वापर डाॅक्टरांनी करु नये. त्याचा त्यांच्या आरोग्यवर विपरीत परिणाम होऊ शकतो. लहान मुलांना संसर्ग हा त्यांच्या आई-वडिलांपासून होतो. कारण, सध्या शाळा बंद आहे. त्यामुळे, त्यांना घरातूनच संसर्ग होतो. पण, त्यांचा मृत्यू दर फारच कमी आहे. वजनाप्रमाणे औषधांचा वापर केला पाहिजे. खरंतर लहान मुलांमध्ये खूप जास्त अडथळे नसतात. शिवाय, ते लवकर बरे होऊ शकतात. त्यांना फारसा त्रास होत नाही. एखाद्या केसमध्ये आधीपासून ज्यांना त्रास होत असेल त्यांना रिकव्हर व्हायला वेळ जाऊ शकतो, असं मृत्यू निरीक्षण समिती सदस्य डाॅ. अविनाश सुपे यांनी सांगितलं. 

( संकलन - सुमित बागुल ) 

panic bell covid is rate in children increasing in maharashtra read detail story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com