esakal | मुंबई : आरेतील बिबट्या अखेर जेरबंद | Panther
sakal

बोलून बातमी शोधा

panther

मुंबई : आरेतील बिबट्या अखेर जेरबंद

sakal_logo
By
मिलिंद तांबे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गेले महिनाभर आरे परिसरात (Aare area) हल्ले करून दहशत माजवणाऱ्या बिबट्याला (panther in prison) शुक्रवारी पहाटे नाव विभागाने जेरबंद केले. जेरबंद केलेली बिबट्या मादी असून आरे परिसरतील रहीवाश्यांवर हल्ले करणारा बिबट्या (Panther attack) म्हणजे हीच मादी असल्याबाबत मात्र अद्याप स्पष्ट झाले नसून त्याबाबत तपास करण्यात येत आहे.

हेही वाचा: रविवारी मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लाॅक

गेल्या महिनाभर बिबट्याने आरे परिसरातील 5 लोकांवर हल्ले करून त्यांना जखमी केले. यामुळे राहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत होती. त्यानुसार वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आरे परिसरात 3 ठिकाणी पिंजरे लावले होते. बिबट्याला आकर्षित करण्यासाठी पिंजऱ्यात कोंबड्या देखील लावण्यात आल्या होत्या. वनविभागाचा हा सापळा यशस्वी झाला असून शुक्रवारी पहाटे 3 वाजता बिबट्या पिंजऱ्यात अडकला.

सध्या या बिबट्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले आहे. वनविभागाकडून त्याची तपासणी करण्यात येत आहे. हल्ले बिबट्याबद्दल खातरजमा करण्यात येत असून मानवी वस्ती जवळील बिबट्याच्या हालचालींवर वनविभाग लक्ष ठेऊन आहे. मात्र मानवी वस्ती जवळील बिबट्या जेरबंद झाल्याने सुटकेचा निश्वास सोडला आहे. दोन दिवसांपूर्वी आरे परिसरात नवजात बिबट्याचा बघडा सापडला होता. या बछड्याला वनविभागाच्या ताब्यात दिल्या नंतर त्यांनी या बघड्याची तपासणी करून त्याला पुन्हा त्याच ठीकाणी सोडले. त्याच्या शोधात आलेली बिबट्या मादी बछड्याला घेऊन निघून गेली.

loading image
go to top