
पनवेल : टपाल नाका परिसरात होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पनवेल महपालिकेकडून अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे. याठिकाणी लवकरच रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असून आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार, अतिक्रमण उपायुक्त रविकिरण घोडके व सहाय्यक आयुक्त डॉ. रुपाली माने यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी नऊ गाळे जमीनदोस्त करण्यात आले.