घाटकोपरमध्ये प्रकाश मेहता-पराग शहा यांच्यात मनोमिलन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

बोरिवलीतून माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे, घाटकोपर पूर्व मधून प्रकाश मेहता यांची तिकीटे कापली. मात्र मेहता याच्या समर्थकांनी गेल्या शनिवारी (ता. 5) शहा यांची गाडी फोडली. पराग शहा हे उद्योगपती आहेत. ते राज्यातील उमेदवारांमध्ये श्रीमंत उमेदवार आहेत. तिकीट नाकारल्याने संतप्त झालेल्या मेहता समर्थकांनी मेहता यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची मागणी केली होती.

मुंबई : माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना उमेदवारी नाकारून भाजपचे पराग शहा यांना घाटकोपर पूर्व या मतदार संघातून उमेदवारी दिल्याने संतप्त झालेल्या मेहता समर्थकांनी शहा यांच्या गाडीवर हल्ला करून गाडीची तोडफोड केली. विधानसभेच्या तिकीटावरून निर्माण झालेला या मतदार संघातील वाद आता मावळला असून पाच दिवसानंतर मेहता-शहा यांचे मनोमिलन झाले आहे. 

बोरिवलीतून माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे, घाटकोपर पूर्व मधून प्रकाश मेहता यांची तिकीटे कापली. मात्र मेहता याच्या समर्थकांनी गेल्या शनिवारी (ता. 5) शहा यांची गाडी फोडली. पराग शहा हे उद्योगपती आहेत. ते राज्यातील उमेदवारांमध्ये श्रीमंत उमेदवार आहेत. तिकीट नाकारल्याने संतप्त झालेल्या मेहता समर्थकांनी मेहता यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची मागणी केली होती. मात्र मेहता यांनी कार्यकर्त्यांना समजावले. जमीन घोटाळ्याचा फटका मेहता यांना या निवडणुकीत बसला. मात्र शहा यांना आयती संधी चालून आली आणि ते नगरसेवक असताना त्यांना थेट विधानसभेचे तिकीट मिळाले. गेल्या पाच दिवसांपासून या मतदार संघात भाजपांतर्गत खदखद होती. काल दोन्ही उमेदवारांचे मनोमिलन झाल्याचे दिसून आले. 

घाटकोपर पूर्वेस असलेल्या भानूशालीवाडीमध्ये शहा यांच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन खासदार संजय राऊत आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय्य राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. यावेळी महेता उपस्थित होते. मेहता यांनी यावेळी शहा यांना मोठ्या मताधिक्‍याने निवडून आणण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, शहा हे शंभर टक्‍के निवडून येतील. या मतदार संघात भाजपचे काहीही नसताना मी हा मतदार संघ बांधला. मतदार संघासाठी मी खूप काही केले आहे, असे बोलता बोलता ते भावूक झाले. शहा यांना शुभेच्छा देताना खासदार राऊत हे शहा यांना म्हणाले की, प्रकाश मेहता हे तुमचे गुरू आहेत. त्यांचा तुम्हाला आशीर्वाद आहे. त्यांच्या आशीर्वानेच तुम्ही निवडून याल. आठवले यांनीही शहा यांना शुभेच्छा दिल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parag Shah and Prakash Mehta campaign together in Mumbai