
नवी दिल्ली- माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपामुळे खळबळ उडाली. असे असेल तरी अनिल देशमुखांकडून या सर्व आरोपांचे खंडन करण्यात आले आहे. यासंदर्भात आता एक मोठी घडामोड समोर येत आहे. परमबीर सिंह यांची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यांनी गृहरक्षक दलात झालेल्या त्यांच्या बदलीला आव्हान दिले आहे. मुंबई पोलिस आयुक्तपदी असताना त्यांना पदावरुन हटवण्यात आले होते. त्यांच्याकडून काही अक्षम्य अशा चुका झाल्या असा दावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. आता परमबीर सिंह यांनी त्यांच्या बदलीविरोधात सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले आहेत. यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ होणार आहे. त्यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव आणखी वाढणार आहे.
माझे आरोप खोटे असतील तर देशमुखांच्या घरचे CCTV तपासा, असं परमबीर सिंग म्हणाले आहेत. सचिन वाझे आणि संजय पाटील यांना कधी कधी बोलावलं याबाबत त्यांनाच विचारा, कारण त्यांना अनेकदा बोलावलं होतं. जर सचिन वाझे छोट्या पदावरील व्यक्ती आहे, असं शरद पवार म्हणत असतील तर गृहमंत्री त्यांना वारंवार का बोलावत होते, असा सवालही त्यांनी केला आहे. अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
संजय पाटील यांना मी व्हॉट्सअप वर तुम्हाला गृहमंत्र्यांनी बोलावलं होतं का विचारलं होत. मी प्रत्यक्ष जाऊन तोंडी मुख्यमंत्र्यांना सांगितलं असतं तर पुरावा राहिला नसता, लेखी पुरावा रहावा म्हणून पत्र लिहिलं, मेल केला म्हणून सही नाही, असं परमबीर सिंह म्हणालेत.
सचिन वाझेवर परमबीर यांचा विश्वास होता, वाझे खोटं बोलतील असं त्यांना वाटलं नव्हतं. सहीसह हार्ड कॉपी पाठवली, होती मात्र काही ठिकाणी रिसिव्ह झाली नाही. सचिन वाझे यांनी जगाला गुडबाय असं स्टेट्स ठेवलं होतं तेव्हा परमबीर यांनी वाझे यांना बोलवून समजावण्याचा प्रयत्न केला होता, त्यांना एक डिस्प्रेनची गोळीही दिली, स्टेटस बघून परमबीर यांना उच्च पदस्थांकडून फोन आला होता. अशी माहिती देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.