esakal | परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

परमबीर सिंह येताच...‘या’कारवाईला स्थगिती!

परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ

sakal_logo
By
नामदेव कुंभार

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अनिल देशमुख यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करत असलेल्या चांदिवाल समितीने मंगळवारी जामिनपात्र वॉरंट जारी केलं होतं. त्यातच भर म्हणून आता परमबीर सिंह यांच्यावर अँटिलिया धमकी प्रकरणाचा अहवाल तयार करण्यासाठी लाच दिल्याचा आरोप झाला आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरणामध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) दाखल केलेल्या आरोपपत्रात एका सायबर तज्ज्ञाने आपल्या जबाबात धक्कादायक खुलासा केला आहे. अँटिलिया घटनेच्या तपासाची दिशाभूल करण्यासाठी जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनेशी संबंधित अहवालाशी छेडछाड करण्यात आली होती. यासाठी, परमबीर सिंह यांनी सायबर तज्ञाला पाच लाख रुपये रोख दिले होते. सायबर तज्ज्ञ 9 मार्च रोजी मुंबई पोलिस आयुक्तालयात परमबीर सिंह यांना भेटायला आला होता.

सायबर तज्ज्ञाने केलेला हा धक्कादायक खुलासा एनआयएने आरोपपत्रात नोंदवला आहे. एनआयएने विचारलेल्या जबाबात सायबर तज्ज्ञाने सांगितले की, अँटिलिया स्फोटक प्रकरणाची जबाबदारी 'जैश-उल-हिंद' या अतिरेकी संघटनेनं स्वीकारली असे अहवालात परमबीर सिंह यांनी लिहिण्यास सांगितले होते. त्यासाठी दिल्लीत इस्रायल दूतावासासमोर स्फोट झाल्यानंतर टेलिग्राम चॅनेलचा वापर करण्यात आला होता. यासाठी पाच लाख रुपयेही देण्यात आल्याचं सायबर तज्ज्ञाने सांगितले. सायबर तज्ज्ञाच्या या धक्कादायक खुलास्यानंतर परमबीर सिंह यांचे पाय आणखी खोलात गेले आहेत.

सुत्रांच्या माहितीनुसार, एनआयएने 5 ऑगस्ट रोजी या सायबर तज्ज्ञाचे स्टेटमेंट रेकॉर्ड केले आहे. त्यामध्ये त्याने असं म्हटलेय की, तो भारतातील अनेक आयपीएस अधिकार्यांना सायबरशी संबंधित प्रशिक्षण देत असतो. गुप्तचर संस्थांसोबतही काम करतो. त्यासंदर्भात 9 मार्च 2021 रोजी मुंबईत असताना ट्रेनिंग संदर्भात परमबीर सिंह यांच्यासोबत भेट झाली. यावेळी अहवालाल फेरफार करण्यासंदर्भात बोलणी झाली.

loading image
go to top