
विरार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वातावरणात नकारात्मकता पसरली असताना एका जेष्ठ जोडप्याने, मात्र या विचारावर मात करत चक्क आपल्या परसात वेगवेगळ्या प्रकारच्या झाडाची निगा राखल्याने आज त्यांची परसबाग वेगवेगळ्या फळांनी बहरून गेली आहे.
वसईच्या सातमादेवी भागात राहणारे राफाएल डायस (वय ८२) व त्यांची पत्नी मेरी राफाएल डायस (वय ७३) यांनी २ ते अडीच गुंठ्याच्या आपल्या घराजवळच्या परिसरात वेगवेगळी झाडे लावली आहेत. त्यात आंबा ,फणस,लाल जांब, बिना बियांचे लिंबू, मलबेरी, सीताफळ, पांढरे जांभूळ, फणस, केळी यांचा समावेश आहे. या सगळ्या झाडांची निगा राखण्या बरोबरच या झाडांना शेणखत आणि सेंद्रिय खत देणे.हे काम नवरा बायको करत आहेत. वसईमध्ये द्राक्ष येणे ही दुर्मिळ गोष्ट आहे. परंतु यांनी द्राक्षांची वेल देखील आपल्या बागेत लावली आहे.
कोरोनामुळे परिसर लॉकडाऊन असला तरी, या जेष्ठ दाम्पत्याचा वेळ मात्र
छानपैकी परसातल्या बागेत जात आहे. वेगवेगळ्या फळाची झाडे परसात असल्याने त्यांना सकाळी पक्षांचा किलबिलाट ऐकायला येतो. त्याने त्यांचे मन आनंदी होते.
शेतीची आवड असल्याने आणि आपल्या पत्नीच्या सहकार्यातून बाग बहरली आहे. निवृत्ती नंतरचा वेळ कसा जाईल असा विचार करण्याची आमच्यावर कधीच वेळ आली नाही. काहींना काही कामात गुंतून घेतल्याने, आज या वयातही आम्ही दोघे फिट आहोत असे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.