भिवंडी रोडवरून रेकॉर्ड-ब्रेक पार्सल वाहतूक; मुंबई विभागातील सर्वात यशस्वी पार्सल स्टेशन

भिवंडी रोडवरून रेकॉर्ड-ब्रेक पार्सल वाहतूक; मुंबई विभागातील सर्वात यशस्वी पार्सल स्टेशन

मुंबई  : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील भिवंडी रोडहून देशभरात पार्सल गाड्यांच्या 35 फेऱ्या चालविण्यात आल्या. याद्वारे एकूण 4 लाख 71 हजार पॅकेजमधून एकूण 7 हजार 246 टन वजनाचे पार्सल पाठविण्यात आले आहेत. 
कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने धैर्याने सामना केला आहे. लॉकडाऊन आणि त्यानंतर अनलॉक कालावधीत यशस्वीरित्या पार्सल आणि मालगाड्या चालवल्या आहेत. ज्यायोगे देशाच्या प्रत्येक कोप-यात आवश्यक वस्तूंची वाहतूक केली जात आहे. 2020 वर्षात भिवंडी रोड स्टेशनचा विकास मुंबई विभागातील सर्वात यशस्वी पार्सल स्टेशन म्हणून विकसित करण्यात आला आहे.
मागील वर्षात भिवंडी रोड स्टेशन ते आजरा (गुवाहाटी), शालीमार, पाटणा आणि इतर ठिकाणी पार्सल गाड्यांच्या 35 ट्रिपमध्ये एकूण 4 लाख 71 हजार पॅकेजमधून एकूण 7 हजार 246 टन वजनाचे पार्सल पाठविण्यात आले. ज्यात फर्निचर, रेफ्रिजरेटर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यपदार्थ यांचा समावेश होता. गोदरेज, ओनिडा, एलजी, बजाज, पार्ले-जी, हिंदुस्तान लीव्हर, डेल-मोंटे, मिल्टन या लोकप्रिय ब्रँडच्या वस्तू, खाद्यपदार्थ, औषधे, प्लास्टिक वस्तू, पिशव्या, स्टेशनरी, वंगण तेल आणि सौंदर्यप्रसाधने यांचा समावेश होता. 

 डिसेंबर 2020 या एका महिन्यात 2 हजार 485 टन वजनाच्या 1 लाख 76 हजार 481 पार्सलच्या पॅकेजेसचे सर्वात जास्त बुकिंग झाले.  (ता.14) डिसेंबर रोजी आजरा, गुवाहाटीकडे जाणाऱ्या पार्सल ट्रेन  मध्ये 27 हजार 591 पॅकेजेसमध्ये 399 टन पार्सलची सर्वाधिक नोंद झाली.

 भिवंडी हे औद्योगिक शहर आणि वस्त्रोद्योगाचे व वखारींचे प्रमुख केंद्र आहे. अमेझॉन, फ्लिपकार्ट, रिलायन्स, स्नॅपडील आणि फेडएक्स सारख्या बऱ्याच ई-कॉमर्स कंपन्यांच्या शाखा शहरात आहेत.  भिवंडी रोड स्थानकाचे मुंबई व ठाणे शहराशी जवळ, उत्तर-दक्षिण आणि जेएनपीटी बंदर मार्ग रेल्वेमार्गाद्वारे जोडणे, यासारखे अनेक फायदे आहेत. वखार आणि ई-कॉमर्स सुविधा आणि ट्रक आणि टेम्पोसाठी पार्किंगची पुरेशी जागा या प्रोत्साहनात्मक स्थितीमुळे रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होत आहे. यासह स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासही मदत होईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. 

parcel transport from Bhiwandi Road The most successful parcel station in the Mumbai division

---------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com