esakal | पालकांनो तुमच्या मुलांच्या भल्यासाठी सायबर सेलने दिल्यात 5 महत्त्वाच्या सूचना, नक्की वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

पालकांनो तुमच्या मुलांच्या भल्यासाठी सायबर सेलने दिल्यात 5 महत्त्वाच्या सूचना, नक्की वाचा...

सध्या मुलं मोठ्या प्रमाणात स्मार्ट फोन वापरतात, त्यामुळे ते स्मार्टफोनवर काय करतायत, कोणत्या साईट्स पाहतायत, कोणते ऑनलाईन गेम खेळतायत यावर बारीक लक्ष ठेवा. 

पालकांनो तुमच्या मुलांच्या भल्यासाठी सायबर सेलने दिल्यात 5 महत्त्वाच्या सूचना, नक्की वाचा...

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : कोरोनामुळे आपण सर्वजण सध्या घरातच आहोत. अशात आपण स्वतः आणि आपली मुलं मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजीचा वापर करतोय. घरातील आई, बाबा हे त्यांच्या कामासाठी कायम मोबाईल लॅपटॉपवर आधीपेक्षा जास्त ऍक्टिव्ह आहेत. तर मुलं देखील ऑनलाईन शिक्षण, ऑनलाईन एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीसाठी स्मार्टफोनचा वापर करून शिकतायत, ज्ञान आणि मनोरंजन घेतायत.

वाढलेल्या सोशल मीडिया, इंटरनेटच्या वापराच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या सायबर सेलने एक अत्यंत म्हह्त्वाची सूचना जरी केलीये. विशेषतः पालकांनी आपल्या मुलांवर नक्की कोणत्या गोष्टी पहिल्या, वापरल्या जातायत यावर नजर ठेवावी असं आवाहनही करण्यात आलंय.

मोठी बातमी - ग्रामपंचायत प्रशासक नेमणुकीवर HCचा ठाकरे सरकारला दणका, ग्रामविकासमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण 

काय आहेत सायबर पोलिसांनी दिलेल्या गाईडलाईन्स : 

  • मुलं मोठ्या प्रमाणात स्मार्ट फोन वापरतात, त्यामुळे ते स्मार्टफोनवर काय करतायत, कोणत्या साईट्स पाहतायत, कोणते ऑनलाईन गेम खेळतायत यावर बारीक लक्ष ठेवा. 
  • सध्या मोठ्या प्रमाणात चाईल्ड पोर्नोग्राफी पाहण्याचं प्रमाण वाढलंय. अशात स्वतः पालकांनी आपण कोणत्या गोष्टी सर्च करून क्लिक करतोय या बाबतीतही सतर्क रायायला हवं. आपल्याकडून पोर्नोग्राफिक वेबसाईट्स सर्च करणं टाळायला हवं. 
  • आपल्या मुलांना ऑनलाइनच्या माध्यमातून कुणी धमकावत तर नाही ना याबाबत पालकांनी सतर्क राहायला हवं. आपला मुलगा कोणते गेम खेळतोय, ऑनलाईन कुणाशी बोलतो, चॅटिंग करतो, त्याला डिप्रेशन तर येत नाहीये ना, याबाबतही सतर्क राहायला हवं. आपला पाळ्या कोट्याही जाळ्यात अडकणार नाही याची पालकांनी पूर्ण काळजी घ्यायला हवी.

मोठी बातमी - ग्रामपंचायत प्रशासक नेमणुकीवर HCचा ठाकरे सरकारला दणका, ग्रामविकासमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण

  • आपले अकाउंट नंबर, आपले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, ATM पिन आपल्या मुलांच्या हातात देऊ नका. कारण त्यांच्याकडून अनावधानाने झालेल्या एका चुकीमुळे तुम्हाला लाखोंचा फटका बसू शकतो. 
  • आणि सर्वात महत्त्वाचं म्हणचे आपला पाल्य कोणत्या ऑनलाईन ट्रॅपमध्ये अडकला असेल तर त्याबाबत आधी त्याच्याशी मोकळेपणाने बोला. ना घाबरता नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार द्या. 

parent alertness guidelines by cyber police when kids are using internet and smartphone

loading image
go to top