पारसिक बोगद्यातील गळती रोखणार

संतोष मोरे
गुरुवार, 14 जून 2018

मुंबई - मध्य रेल्वेमार्गावरील १०० वर्षे जुन्या पारसिक बोगद्याच्या दुरुस्तीचे काम रेल्वेने जूनच्या पहिल्या आठवड्यात हाती घेतले आहे. बोगद्यात होत असलेली गळती थांबवण्यासाठी मुंबई विभागात प्रथमच केमिकल ग्राऊंटिंग प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.  

१८७३ मध्ये बांधण्यात आलेला पारसिक बोगदा १९१६ मध्ये प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. १.३ किमी लांबीचा बोगदा मुंबई-कल्याणदरम्यान जलद मार्गावर आहे. मात्र, लाखो प्रवाशांना त्यातून गळणाऱ्या पाण्याचा त्रास सहन करावा लागतो. पावसात पारसिक टेकड्यावरून पाणी खाली येते आणि बोगद्याच्या छतावरून झिरपते. मध्य रेल्वेने पारसिक बोगद्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. डिसेंबर २०१८ पर्यंत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मध्य रेल्वेसमोर आहे. काही वर्षांपासून पारसिक बोगद्यामध्ये जागोजागी होत असलेली पाण्याची गळती बंद करण्याचे मोठे आव्हान रेल्वेसमोर होते. अखेर त्यावर रेल्वेला उपाय सापडला आहे. काश्‍मीरमध्ये रेल्वे मार्गावरील बोगद्यामधील गळती रोखण्यासाठी वापरण्यात आलेली केमिकल ग्राऊंटिंग प्रक्रिया पारसिक बोगद्यात राबवण्यात येईल. 

केमिकल ग्राऊंटिंग प्रक्रिया कशी असणार? 
ड्रिलच्या साहाय्याने बोगद्यात ४०० छेद करण्यात येतील. त्यानंतर पंपाच्या माध्यमातून केमिकल ग्राऊंटिंग छेद केलेल्या ठिकाणी सोडण्यात येईल. बोगद्यात ३५ ते ४० डिग्रीच्या दरम्यान संपूर्ण भागात ग्राऊंटिंग प्रक्रिया राबवली जाईल. त्यामुळे बोगद्याच्या भिंती व छतावर असलेल्या भेगा बंद होतील. 

Web Title: parsik tunnel leakage