सर्वात मोठी प्रतिक्रिया : सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर पार्थ पवार म्हणतात...

सुमित बागुल
Wednesday, 19 August 2020

आज सुप्रीम कोर्टाकडून सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या तपासणीबाबत निकाल दिलाय. या प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे CBI मार्फत आता तपास केला जाणार आहे. 

मुंबई : सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मोठा निर्णय दिलाय. या प्रकरणात आता मुंबई पोलिस तपासणी करणार नसून CBI कडे या प्रकरणाच्या तपासणीची सूत्र सोपवली जाणार आहेत. 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून महाराष्ट्रात मोठं राजकीय नाट्य देखील रंगतंय. या प्रकरणात अनेक बडे नेते आणि असामींकडून CBI तपासणीची मागणी केली गेलेली. दरम्यान या प्रकरणात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनीही सुशांत सिंह राजपूत प्रकरणात CBI चौकशीची मागणी केली होती. तसं पत्र पार्थ पवार यांनी त्यांच्याच पक्षाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलं होतं.  

मात्र, आता मागच्या काही दिवसात महाराष्ट्राचं राजकारण ज्या मुद्द्यावरून ढवळून निघालं त्यावरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर पार्थ यांनी अत्यंत महत्त्वाचं ट्विट केलंय. आज सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय दिलाय. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी अत्यंत बोलकी प्रतिक्रिया दिलीये. या ट्विट मध्ये पार्थ पवार यांनी 'सत्यमेव जयते' असं ट्विट केलंय. 

पार्थ पवार यांच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही

याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही असं विधान केलेलं. दरम्यान आज सुप्रीम कोर्टाकडून सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या तपासणीबाबत निकाल दिलाय. या प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे CBI मार्फत आता तपास केला जाणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: parth pawar says satyamev jayate after supreme courts verdict on sushant singh rajput investigation