प्रवासी वाहतूक परवाना आता ऑनलाइन

Mumbai-RTO
Mumbai-RTO
Updated on

मुंबई - महापालिका क्षेत्राबाहेर प्रवासी वाहतूक करण्यासाठी आवश्‍यक परवाना आता ऑनलाइन पद्धतीने मिळणार आहे. हा परवाना कार्यालयीन वेळेनंतर मिळत नसल्याने बेकायदा वाहतुकीत वाढ झाली होती. आरटीओ विभागाने परवाना प्रक्रिया ऑनलाइन केल्यामुळे ही समस्या दूर होणार आहे.

राज्यातील एका शहरातून दुसऱ्या शहरात जायचे असल्यास आरटीओ विभागाकडून प्रवासी वाहतूक परवाना घ्यावा लागतो. कार्यालयीन वेळेनंतर वाहतूकदारांना हा परवाना मिळविणे शक्‍य नसते. त्यातच शनिवार, रविवार आणि सरकारी सुट्यांच्या दिवशी प्रवासी वाहतुकीत अनेकदा समस्या येतात. त्यामुळे विनापरवाना प्रवासी वाहतुकीत वाढ झाली आहे. आता आरटीओ विभागाने प्रवासी वाहतूक परवाना ऑनलाइन पद्धतीने देणे सुरू केल्यामुळे वाहतूकदारांची सोय झाली आहे.

प्रवासी वाहतूक परवाना ऑनलाइन देण्यास 25 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. तेव्हापासून मागील 18 दिवसांत राज्यात सुमारे चार हजार ऑनलाइन परवाने देण्यात आले आहेत. उन्हाळ्याच्या सुटीत सहली, लग्नसोहळे आणि पर्यटनामुळे प्रवासी वाहतुकीत मोठी वाढ होते. या काळात शहराबाहेर जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ होते. प्रवासी वाहतूक परवाना ऑनलाइन पद्धतीने मिळत असल्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com