एसी लोकलमध्ये फुकट्यांची चंगळ

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 1 February 2020

पनवेल-ठाणे या वातानूकूलित एसी लोकलची गुरुवारी (ता.30) मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. तर शुक्रवारी पहिला दिवस असल्याने अनेक प्रवाशांनी लोकलने जाण्याचे टाळत या गाडीने प्रवास केला. तिकिटाचे दर जास्त असल्यामुळे यातील अनेक चाकरमान्यांनी एसी लोकलचे तिकीट काढण्याकडे पाठ फिरवली.

नवी मुंबई : पनवेल-ठाणे या वातानूकूलित एसी लोकलची गुरुवारी (ता.30) मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. तर शुक्रवारी पहिला दिवस असल्याने अनेक प्रवाशांनी लोकलने जाण्याचे टाळत या गाडीने प्रवास केला. तिकिटाचे दर जास्त असल्यामुळे यातील अनेक चाकरमान्यांनी एसी लोकलचे तिकीट काढण्याकडे पाठ फिरवली. तर प्रथम श्रेणी पासधारकांनी एसी लोकलने प्रवास केला. मात्र, पहिलाच दिवस असल्यामुळे तिकीट तपासनीसांनी दंडाची आकरणी न करता, एसी लोकलचे तिकीट वेगळे असल्याचे सांगत प्रवाशांना खाली उतरवले. 

ही बातमी वाचली का? पुस्तक म्हणजे फॅशन नाही

पनवेल-ठाणे वातानुकूलित एसी लोकलला सकाळी 5.43 मिनिटांच्या पाहिल्या लोकलमध्ये चाकरमान्यांनी, पहिलाच दिवस असल्याचे सांगत प्रवास करण्यास सुरुवात केली; मात्र तिकीट तपासनीसांनी एसी लोकलमधून प्रवास करता येत नसल्याचे सांगत त्यांना खाली उतरण्यास सांगितले. मात्र, प्रवासी खाली उतरण्यास तयार नसल्यामुळे चाकरमान्यांना आरपीएफ व रेल्वे पोलिसांच्या सहकार्याने प्रवाशांना उतरवण्यास सांगितले. लोकल रेल्वेस्थानकांवर आल्यानंतर त्यातील प्रवाशांनी पहिला दिवस मोफत असल्याचे सांगितले व लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिकीट तपासनीस तिकिटाशिवाय प्रवेश देत नसल्याने महिला प्रवाशांनी संताप व्यक्त केला. तर ज्या काही अल्प प्रवाशांनी एसी लोकलचे तिकीट काढण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्याच लोकलमधील प्रवाशांबरोबर तिकीट काढण्यास उभे राहावे लागले होते. तिकीट काढून एसी लोकलचा प्रवास करण्यास प्रतिसाद मिळाला नसला, तरी सेल्फी काढण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली होती. 

ही बातमी वाचली का? वाढीव बिलामुळे माणगावकरांना विजेचा शॉक

आरपीएफ पोलिसांची तारांबळ 
रेल्वेकडून एसी लोकलमध्ये प्रवास करू नये, अशी उद्‌घोषणा केल्यानंतरही प्रवासी लोकलमध्ये चढत होते; तर लोकल सुरू होण्यापूर्वी सर्व गाडयांची दारे बंद झाल्याने, अनेकांनी तसेच पुढील स्थानक गाठले. मात्र, या वेळी एसी लोकलमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना खाली उतरवताना आरपीएफ पोलिसांची तांरबळ उडत होती. एसी लोकलचे तिकीट जरी जास्त असले तरी ज्या खासगी कंपनीमध्ये वाहन भत्ता देण्यात येतो, ते प्रवासी एसी लोकलने प्रवास करतील, अशी आशा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: passenger travels without ticket AC loacl