पवई तलावाभोवतीच्या अवैध सायकल ट्रॅक; पर्यावरण विभागाकडून दखल

Cycle track
Cycle tracksakal media

मुंबई : पवई तलावाभोवती (pawai lake) होणाऱ्या ट्रॅकमुळे मगरी आणि अन्य वन्यजीवांचे अस्तिव धोक्यात (Animals in danger) येत असल्याने पर्यावरण प्रेमींनी (Environment) या सायकल ट्रॅकला (illegal cycle track) विरोध केला. याबाबत काही विद्यार्थ्यांनी केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडे (central ministry) तक्रार केली होती.त्याची दखल घेत सरकारला योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

Cycle track
BMC : रस्ते अभियंत्यांवर अतिरिक्त भार; महापौरांचा संताप

मुंबई आयआयटी लगत हा प्रकल्प प्रस्तावित आहे. महानगरपालिका आणि महाराष्‍ट्र पर्यटन विकास निगम यांचा हा संयुक्त प्रकल्प आहे.या कामासाठी पर्यावरण तज्ज्ञांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहे. त्यानुसार पर्यावरण तज्ज्ञांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. प्रकल्पासाठी वन आणि वन्यजीव विभागाची मंजुरी अनिवार्य असून त्याला अद्याप मंजूरी देण्यात आलेली नाही असे आर्द्र भूमी तक्रार निवारण समितीचे सदस्य तसेच वनशक्ती संस्थेचे प्रमुख स्टॅलिन दयानंद यांनी सांगितले.

पवई तलावात भारतीय मार्श मगरी आहेत.वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत अनुसूची 1 नुसार या असंरक्षित प्रजाती असून त्यांच्यासाठी राष्ट्रीय वन्यजीव आणि वन विभागाची या उपक्रमासाठी परवानगी आवश्यक आहे. मात्र अशी कोणतीही परवानगी मिळालेली नाही तर उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या आर्द्र भूमी तक्रार निवारण समितीने महाराष्ट्र आणि केंद्रातील अधिकाऱ्यांना पत्र लिहून पवई तलावाजवळील सायकलिंग ट्रॅक प्रकल्पाबाबत तक्रार केली. त्यानंतर आयआयटी बॉम्बे येथील पीएचडी विद्यार्थी ओंकार महादेव सुपेकर यांनी केलेल्या तक्रारीला तलावा लगत होणाऱ्या सायकल ट्रॅकमुळे होणाऱ्या अडचणींबाबत केंद्रीय मंत्रालयाने 21 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र वन विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून बांधकाम उपक्रमांकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी केली होती,त्याची दखल घेण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com