esakal | मलबार हिल परिसरात एक चौरस फुटांचा फ्लॅट घ्यायचाय ? किंमत वाचाल तर डोळे पांढरे पडतील
sakal

बोलून बातमी शोधा

मलबार हिल परिसरात एक चौरस फुटांचा फ्लॅट घ्यायचाय ? किंमत वाचाल तर डोळे पांढरे पडतील

मलबार हिल (झोन - कंबाला हिल) -  ८६ हजार ९६१ रुपये प्रति चौरस फूट

मलबार हिल परिसरात एक चौरस फुटांचा फ्लॅट घ्यायचाय ? किंमत वाचाल तर डोळे पांढरे पडतील

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : राज्यातील रेडी रेकनर दरांमध्ये नुकतेच बदल करण्यात आलेत. तब्बल आधीच वर्ष स्थिर असलेल्या दरांमध्ये बदल झाल्यानंतर मुंबईतील विविध भागांवर याचा कसा परिणाम झालाय हे आपण या बातमीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.

मुंबईतील उच्चभ्रू लोक्वास्ट असणाऱ्या मलबार हिल परिसरात एकूण १८ झोन्स आहेत. रडू रेकनर दरांमध्ये बदल झाल्याने विधिध भागांवर परिणाम झालाय. काही झोनमध्ये दरांमध्ये दहा टक्के कपात तर काही झोनमध्ये पाच टक्के वाढ पाहायला मिळतेय. निवासी भागांचा विचार केला तर सर्वात वर नंबर कंबाला हिलचा आहे. त्याखालोखाल कुलाबा, वरळी आणि तिसरा नंबर लोअर परळचा लागतोय.  कंबाला हिल झोनचे दर सर्वाधिक म्हणजेच प्रति चौरस फुटांसाठी सरकारने ८६ हजार ९६१ रुपये इतके निश्चित केले गेलेत.

महत्त्वाची बातमी : मनसे नेते संदीप देशपांडे सविनय कायदेभंग करण्याच्या तयारीत, सरकारला दिला मोठा इशारा 

  • मलबार हिल (झोन - कंबाला हिल) -  ८६ हजार ९६१ रुपये प्रति चौरस फूट
  • कुलाबा  - ६८ हजार ४७० रुपये प्रति चौरस फूट
  • वरळी - ६४ हजार ५८० प्रति चौरस फूट
  • लोअर परेल - ५२ हजार ३६० प्रति चौरस फूट

एक हजार चुरस फूट घराची किंमत ८ कोटी ७० लाख : 

नुकत्याच बदललेल्या रेडी रेकनर दरांनंतर सरकारने मलबार हिलमधील कंबाला हिल भागात ८६ हजार ९६१ रुपये इतका भाव निश्चित केलाय. यामुळे या भागात एक हजार चौरस फुटांचा एखादा फ्लॅट कुणाला विकत घायचा असल्यास त्या प्रापर्टीसाठी तब्बल ८ कोटी ७० लाख रुपये इतकी किंमत मोजावी लागेल. यावर अतिरिक्त मुद्रांक शुल्क देखील भरावा लागणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्यभात बाजारभावानुसार या ठिकाणच्या घरांची किंमत ही रेडीरेकनरच्या सव्वापट असल्याचे बोललं जातंय.

pay eight crore seventy lac rupees for one thousand square feet flat in malbar hill   

loading image