''फी भरा अन्यथा ऑनलाइन शिक्षण बंद करू''; खारघरमधील ग्रीनफिंगर्स ग्लोबल स्कूलची पालकांना धमकी

गजानन चव्हाण
Sunday, 10 January 2021

कोरोनामुळे  आर्थिक अडचणीत सापडलेल्या पालकांकडून जादा फी वसूल करण्याऱ्या तसेच विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद करण्याची धमकी देणाऱ्या ग्रीनफिंगर्स ग्लोबल स्कूलच्या विरोधात पालकांनी रविवारी शाळेपुढे जोरदार आंदोलन केले

खारघर : कोरोनामुळे  आर्थिक अडचणीत सापडलेल्या पालकांकडून जादा फी वसूल करण्यासाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद करण्याची धमकी देणाऱ्या खारघर मधील ग्रीनफिंगर्स ग्लोबल स्कूलच्या विरोधात पालकांनी रविवारी शाळेपुढे जोरदार आंदोलन केले. शाळेने वार्षिक शिक्षण शुल्क आणि इतर वाढीव शुल्क कमी केले नाही तर आम्ही आंदोलन आणखी तीव्र करू, असा इशारा पालकांनी यावेळी दिला.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

खारघर सेक्टर 12 मधील ग्रीन फिंगर स्कुलमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेत आहे.  कोविड मुळे शैक्षणिक शुल्क वाढ करू नये. तसेच जे शुल्क  न भरणार नाही.अशा विध्यार्थावर  कोणतीही कारवाई करू नये असे शासनाच्या शिक्षण विभागाने अध्यादेश काढला आहे. मात्र ग्रीन फिंगर स्कुलकडून  जादा फी वसूल करण्यासाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद करण्याची धमकी दिल्यामुळे पालकांनी रविवार ता.10 रोजी पालकांनी आंदोलन करून  फि साठी धमकावणाऱ्या   ग्रीनफिंगर्स ग्लोबल स्कुलवर तडकाफडकी कारवाई करण्याची मागणी केली.  या प्रश्नावर सोमवारी रायगड जिल्हा पनवेल विभागाचे गटशिक्षणाधिकारी  नवनाथ साबळे यांची भेट घेऊन संबंधित शाळेवर कारवाई करण्याची मागणी केली जाणार असल्याचे पालकांनी सांगितले. तसेच पालकांनी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू   यांची मंगळवारी मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेऊन पालकांना फी साठी धमकावणाऱ्या   ग्रीनफिंगर्स ग्लोबल स्कुलवर तडकाफडकी कारवाई करण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती पालकांनी सांगितले.

 

शाळेकडून ऑनलाइन शिक्षण घेतले जात आहे.मात्र शैक्षणिक शुल्क ऐवजी इतर फीची मागणी केली जात आहे.
तसेच  पालकांना कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही.-

सचिन पवार
पालक.

शाळेने कोविडमुळे शैक्षणिक शुल्क वाढ केलेली नाही.तसेच जी शैक्षणिक शुल्क आकारली जात आहे. त्या विषयी शाळा पालक समितीने ठरविले त्यानुसार शैक्षणिक शुल्क आकारले जात आहे.-अंजु वेदी
प्राचार्य , ग्रीन फिंगर ग्लोबल स्कुल खारघर

Pay the fee or we will stop teaching online Greenfingers Global School in Kharghar warns to parents

----------------------------------

 (संपादन - तुषार सोनवणे )

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pay the fee or we will stop teaching online Greenfingers Global School in Kharghar warns to parents