esakal | मोठी बातमी - तज्ज्ञ सांगतायत जुलै आणि ऑगस्टमध्ये कोरोना माजवणार हाहाकार,रुग्णसंख्या 'इतकी' वाढू शकते..
sakal

बोलून बातमी शोधा

मोठी बातमी - तज्ज्ञ सांगतायत जुलै आणि ऑगस्टमध्ये कोरोना माजवणार हाहाकार,रुग्णसंख्या 'इतकी' वाढू शकते..

मुंबईतील MMR भागात पुन्हा लॉकडाउन जारी करण्यात आलाय. ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, उल्हासनगर या सर्व शहरांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येतायत.

मोठी बातमी - तज्ज्ञ सांगतायत जुलै आणि ऑगस्टमध्ये कोरोना माजवणार हाहाकार,रुग्णसंख्या 'इतकी' वाढू शकते..

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील MMR भागात पुन्हा लॉकडाउन जारी करण्यात आलाय. ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, उल्हासनगर या सर्व शहरांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येतायत. मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनलॉकची प्रक्रिया सुरु केल्यानंतर, नियम शिथिल केल्यानंतर पुन्हा कॉर्न रुग्ण वाढताना पाहायला मिळतायत. केवळ मुंबई पुण्यात नाही, महाराष्ट्रात नाही तर जगभरात कोरोनाचा प्रभाव कमी होताना पाहायला मिळत नाही. 

मोठी बातमी - 'हे' शहर आज सायंकाळी 5 पासून थेट 12 जुलैपर्यंत थांबणार ! कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचे आयुक्तांचे निर्देश 

खरंतर उष्ण वातावरणात कोरोना टिकणार नाही, उन्हाळ्यात कोरोनाचा प्रभाव कमी होणार असे अनेक तर्क लावले गेलेले. मात्र तसं काहीही झालं नाही. खरंतर मुंबई सारख्या शहरात एप्रिल आणि मे महिन्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आलेत. कोरोना रुग्णाचं प्रमाण कुठेही कमी होताना पाहायला मिळालं नाही. अमेरिकेत तर २४ तासात लाखभर रुग्ण आढळून येतायत. आता भारतात ऋतू बदललाय, पावसाळा सुरु झालाय. अशात अनेक साथीचे किंवा व्हायरल आजार डोकं वर काढताना पाहायला मिळतात. या पार्श्वभूमीवर कोरोना रोखण्यासाठी केले जाणारे उपाय देखील महत्त्वाचे आहेत. या उपाय योजनांवर कोरोनाचा आकडा वाढणे किंवा कमी होणे हे अवलंबून असतं.   

मात्र गणितीय डेटा चा अभ्यास करून काही तज्ज्ञांनी जुलै आणि ऑगस्ट मधील कोरोना रुग्णसंखेचा अंदाज लावलाय. तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे ज्याप्रकारे जून महिन्यात मोठया प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आलेत, त्याचप्रकारे जुलै महिन्यात देखील कोरोनाचे रुग्ण आढळून येतील असा अंदाज लावला जातोय. कदाचित जून महिन्यापेक्षा जुलै महिन्यात अधिक रुग्ण आढळून येऊ शकतात असंही तज्ज्ञ म्हणतायत.  

मोठी बातमी - कोरोना चाचणीचा विचार करताय? प्रिस्क्रिप्शन बद्दल कन्फ्युज आहात? आधी 'हे' वाचा.. 

आरोग्य मंत्रालयाकडून आलेली महत्त्वाची माहिती : 

  • 31 मेपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 1,82,143 होती
  • 1 जुलैरोजी ही संख्या 5, 85,493 वर पोहोचली
  • जून महिन्यात 3.48 लाखहून अधिक कोरोनाची लागण झालेले नवीन रुग्ण आढळले
  • कोरोनामुळे मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात जास्त मृत्यू झाले

तज्ज्ञांच्या मते आतापर्यंतच्या डेटाचं ऍनालिसिस केलं तर जुलै महिन्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत चाळीस ते पन्नास टक्के अधिक रुग्ण आढळून येऊ शकतात. म्हणजेच जुलै महिन्यात भारतात साधारण पाच ते सहा लाख नागरिक कोरोना पॉझिटिव्ह म्हणून आढळून येऊ शकतात. तर जुलै आणि ऑगस्ट महिना हा कोरोनाचा पीक म्हणजे सर्वाधिक रुग्णसंख्या असलेला काळ असू शकतो असा अंदाज बांधण्यात येतोय. 

peak of corona will come in july and august says data analyst specialist

loading image
go to top