जोगेश्‍वरीच्या ट्रामा केअरमधील शिशू अतिदक्षता विभाग सुरू होणार; डॉक्‍टरांची नियुक्ती करण्याचा BMCचा निर्णय

जोगेश्‍वरीच्या ट्रामा केअरमधील शिशू अतिदक्षता विभाग सुरू होणार; डॉक्‍टरांची नियुक्ती करण्याचा BMCचा निर्णय


मुंबई : डॉक्‍टरांच्या कमतरतेमुळे गेल्या सात वर्षांत जोगेश्‍वरी ट्रामा केअर रुग्णालयात शिशू अतिदक्षता विभाग सुरू झाला नाही. यावर उपाय म्हणून महापालिकेने आता कंत्राटी डॉक्‍टरांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. 

खासगी रुग्णालयाच्या तुलनेने अपुरे वेतन आणि प्रचंड कामाचा ताण यामुळे सार्वजनिक रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्‍टर काम करण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे आरोग्य सेवेवरील तसेच कार्यरत डॉक्‍टरांवरील ताण वाढतच आहे. पालिकेने जोगेश्‍वरी येथे 2013 मध्ये ट्रामा केअर रुग्णालय सुरू केले; मात्र डॉक्‍टरांच्या अभावामुळे रुग्णालयात अद्याप शिशू अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) सुरू झाला नाही. या विभागासाठी आवश्‍यक निओ नॅटल व्हेंटिलेटर, बेबी वॉर्मर, एसपीओटू मशीन विथ पेडियाट्रिक निओनटल प्रोब, आयसीयू बेड, सीएफएल डब तसेच सिंगल बेड सर्फेस फोटोथेरपी युनिट इन एमएस तसेच फोटोथेरपी युनिट अशी अद्ययावत उपकरणे उपलब्ध आहेत. त्यांच्या खरेदीवर पालिकेने आतापर्यंत लाखो रुपये खर्च केले; मात्र अद्याप हा विभाग सुरू होऊ शकला नाही. पालिकेने या विभागासाठी कंत्राटी डॉक्‍टर नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जीवनज्योत चॅरिटेबल ट्रस्टसोबत दोन वर्षांसाठी करार करण्यात येणार आहे. दोन वर्षांसाठी पालिका तीन कोटी 24 लाख रुपये या संस्थेला देणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरीही दिली आहे. 

... तर कंत्राटी सेवा वाढणार 
पालिकेने दोन वर्षांसाठी हा करार केला आहे; मात्र या काळात पूर्णवेळ डॉक्‍टर भरले न गेल्यास पुन्हा कंत्राटी पद्धतीने डॉक्‍टरांची नियुक्ती करावी लागणार आहे. अतिदक्षता विभागासाठी फक्त निष्णांत डॉक्‍टरच लागत नाही तर ती यंत्रणा समजणाऱ्या परिचारिकाही लागतात. त्या परिचारिकाही मिळणे अवघड असते. 

असे असतील कर्मचारी 
वैद्यकीय अधिकारी- 07 
वैद्यकीय सल्लागार- 01 
परिचारिका- 14 

Pediatric Intensive Care Unit at Jogeshwari Trauma Care to be started

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com