मुंब्रावासीयांना लॉकडाऊनचे गांभीर्यच नाही!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

कळव्यात कोरोनाचे 10; तर मुंब्य्रात 2 रुग्ण सापडल्यामुळे मंगळवारपासून (ता. 7) कळवा आणि मुंब्रा संपूर्णपणे 'लॉकडाऊन' करण्यात आले आहे. या भागातील औषधांची दुकाने वगळता इतर सर्वच अत्यावश्‍यक सेवाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यानंतही लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी मुंब्य्रात अत्यावश्‍यक सेवा बंद असतानाही रस्त्यावरील नागरिकांची वर्दळ मात्र कमी झाली नसल्याचे दिसले. 

ठाणे : कळव्यात कोरोनाचे 10; तर मुंब्य्रात 2 रुग्ण सापडल्यामुळे मंगळवारपासून (ता. 7) कळवा आणि मुंब्रा संपूर्णपणे 'लॉकडाऊन' करण्यात आले आहे. या भागातील औषधांची दुकाने वगळता इतर सर्वच अत्यावश्‍यक सेवाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यानंतही लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी मुंब्य्रात अत्यावश्‍यक सेवा बंद असतानाही रस्त्यावरील नागरिकांची वर्दळ मात्र कमी झाली नसल्याचे दिसले. 

ठाणेकरांना दिलासा! लॉकडाऊनमध्ये घरपोच मिळणार भाजीपाला...

मुंब्रा येथील मेडिकल वगळता इतर अत्यावश्‍यक सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या, तरीदेखील नागरिक हातात पिशव्या घेऊन रस्त्यावर फिरताना दिसले. तसेच अनेक गल्ली-बोळांतूनही नागरिकांची तेवढीच वर्दळ दिसत होती. रस्त्यावर वाहनेदेखील धावताना दिसत होती. गरज नसेल, तर घराबाहेर पडू नका, असे आवाहन करूनही नागरिकांनी त्याकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे अजूनही मुंब्य्रातील रहिवाशांना लॉकडाऊनचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते. 

भाजी मार्केटही बंद 
कळवा आणि मुंब्रा परिसरात भाजी मार्केट, किराणा मालाची दुकानेदेखील पूर्णपणे बंद करण्यात आली असून पुढील आदेश मिळेपर्यंत ते बंद राहणार आहे. त्यामुळे या काळात नागरिकांना काही हवे असल्यास त्या वस्तू त्यांना घरपोच देण्यासाठी पालिकेच्या वतीने कळवा आणि मुंब्य्रातील दुकानांची, दूधवाल्यांची, भाजी विक्रेत्यांची यादी नंबरसह सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावर फोन करून ज्या वस्तू हव्या असतील त्या दिल्या जातील, असेही सांगण्यात आले आहे. 

सावधान! भामट्यांकडून फसवणुकीची नवी स्टाईल

वृदांवनमधील रहिवाशांची चाचणी सुरू 
ठाण्यातील वृंदावन भागात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर आता या भागातील 500 मीटर पर्यंतचा परिसर सील करण्यात आला आहे. त्यानुसार येथील पाच ते सात इमारतीदेखील सील करण्यात आल्या आहेत. आता येथील रहिवाशांची तपासणीदेखील पालिकेच्या माध्यमातून सुरू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Peoples from MUMBRA not serious about Lockdown