बापरे, रुग्णांसाठी करावी लागते झोळीचा वापर; या तालुक्यातील आदिवासी वाड्यांमध्ये पक्के रस्तेच नाही

कर्जत : रुग्णाला अशा प्रकारे झोळी नेण्यात येते.
कर्जत : रुग्णाला अशा प्रकारे झोळी नेण्यात येते.

कर्जत : कर्जत तालुक्‍यातील डोंगरांमध्ये राहणारा आदिवासी समाज आजही उपेक्षित आहे. त्यांच्यापर्यंत पुरेशी जीवनावश्‍यक साधने आजही पोहोचलेली नाही. रस्ता नसल्याने आजारी व्यक्तीला किंवा गर्भवती महिलेला दवाखान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक दिव्य पार करावे लागत आहे. सागाची वाडी येथील तरुण पायाला दुखापत झाल्याने घरीच पडून होता. रस्ता नसल्याने कोणत्याही प्रकारे दवाखान्यात पोहोचणे शक्‍य नव्हते. अशा वेळी गावातील तरुणांनी डोली करून त्याला पावसापासून संरक्षण करत डोंगर उतरून दवाखान्यापर्यंत पोहोचवले.

कर्जत तालुक्‍यात कातकरी, ठाकूर, महादेव कोळी, धनगर अशा विविध जमाती डोंगर कोपऱ्यात राहत आहेत. परंतु, या लोकांपर्यंत साधी प्राथमिक सुविधाही नसल्याने त्यांना अतोनात कष्ट होत आहेत. सागाची वाडी, नानाचा माळ, चिंचवाडी, असलवाडी, पाली धनगरवाडी, बोरीची वाडी, धमन दांड वाडी, भूतिवली वाडी, नानाचा माळ, धनगरवाडा, या अस्सल ग्रामपंचायतमधील वाड्यांना आजतागायत पक्का रस्ता नाही. वाडीमधून डोंगरावर पक्के रस्ते नसल्याने नेरळ किंवा कर्जतमधील दवाखान्यात पोहोचण्यासाठी कच्च्या रस्त्यांचा वापर करावा लागत आहे. या ठिकाणावरून कोणत्याही प्रकारच्या वाहनांना जाणे शक्‍य होत नाही. 

एखाद्या पुरुषाला आजारपणात वा गर्भवती स्त्रीला दवाखान्यात उपचारासाठी घेऊन जाणे, हे खूप कष्टाचे काम होत आहे. प्रशासनाने आजतागायत वैद्यकीय सेवा दिली नाही. रस्ते बनवले नाहीत. या दरम्यान, एखाद्या माणसाचा जीव गेल्यास जबाबदार कोण राहील? असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. दरम्यान, या रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी असल ग्रामपंचायत सरपंच रमेश लदगे आणि रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर समाज संघटना अध्यक्ष मालू निरगुडा यांनी केली आहे. 

उपचारासाठी अनवाणी पायाने गेले 
सागाची वाडी येथील संदीप निरगुडे हा तरुण पायाला दुखापत झाल्याने घरीच पडून होता. पावसाअभावी त्याला घरातून निघून हॉस्पिटलला जाणेही शक्‍य नव्हते. अखेर तिसऱ्या दिवशी गावातील तरुणांनी झोळी करत डोलीच्या साह्याने दोन नद्या अनवाणी पायाने पार केल्या. त्यानंतर नेरळ येथील सुविधा हॉस्पिटलपर्यंत पोहोचले. रस्ते नाहीत व नद्यांना साकव अथवा पूल नाही. कोणतेही वाहन पावसाळ्यामध्ये या वाडीपर्यंत पोहोचू शकत नसल्याने आजारी लोकांना अक्षरशः झोळीमध्ये टाकून डोंगर उतरावे लागत आहे. या लोकांचे प्रश्न कधी सुटतील? असा तीव्र सवाल या विचारला जात आहे. 

(संपादन : उमा शिंदे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com