राज्यात नौकाविहार, वॉटरस्पोर्ट्सला परवानगी; सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

तुषार सोनवणे
Wednesday, 23 December 2020

राज्य सरकारने शासन आदेश जारी केला आहे. त्यात पर्यटनासाठी कोरोना नियमावली   आणखी शिथिल करण्यात आली आहे. 

मुंबई - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पर्यटन स्थळे बंद करण्यात आली होती. परंतू आता कोरोना संसर्ग कमी होत असताना, पर्यटन स्थळे देखील सुरू होत आहेत. राज्यातील रेल्वे, शाळा महाविद्यालये आदी वगळता, जवळपास सर्वच व्यवहार हळुहळू पूर्वपदावर येत आहेत. आता राज्य सरकारने शासन आदेश जारी केला आहे. त्यात पर्यटनासाठी आणखी कोरोना नियमावली शिथिल करण्यात आली आहे. 

मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील वॉटरपार्क, वॉटर स्पोर्ट्स, नौकाविहार आदींच्या पर्यटनासाठी गृहमंत्रालयाकडून पर्यटनासाठी परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच एॅसेसमेंट पार्क, मनोरंजन पार्क, इनडोअर इंटरटेंमेंट अॅक्टिव्हिटी, टुरिस्ट प्लेसेस पर्यटनासाठी खुले करण्यात आले आहेत. या सर्व प्रकारातील पर्यटन कॅंन्टॉन्मेंट झोन वगळता सर्व ठिकाणी सुरू करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक प्रणालीच्या पार्श्वभूमीवर ही मार्गदर्शक तत्वे राज्य सरकारकडून जारी करण्यात आली आहेत.

Permission for boating, watersports, indoor entertainment in the state Government guidelines issued

--------------------------------------------------------------------------

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Permission for boating, watersports, indoor entertainment in the state Government guidelines issued