एमएमआरडीएच्या अकराशे कोटींच्या कामांना मंजुरी; प्रकल्पाच्या कामाला गती येणार | MMRDA News Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MMRDA

एमएमआरडीएच्या अकराशे कोटींच्या कामांना मंजुरी; प्रकल्पाच्या कामाला गती येणार

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) कार्यकारी समितीची बैठक मंगळवारी (ता. २२) राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव (Munukumar srivastava) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत डी. एन. नगर ते मंडाले या मेट्रो २ ब प्रकल्पाच्या (Metro project) सी १०२ पॅकेजच्या कामासाठी आणि मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या पॅकेज ४ मधील विविध कामांसाठी सुमारे १ हजार १८६ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे मेट्रो २ ब आणि मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या कामाला आणखी गती येणार आहे.

हेही वाचा: डोंबिवली : KDMTच्या बसला भीषण आग; जीवितहानी नाही

समितीच्या बैठकीत डी. एन. नगर ते मंडाले या मेट्रो २ ब प्रकल्पाच्या एमटीएनएल बीकेसी ते डायमंड गार्डन (चेंबूर ) उन्नत मेट्रो मार्गासाथीच्या ७५९.६८ कोटींच्या कामाला समितीने मंजुरी दिली. तसेच मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या पॅकेज ४ मधील इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम (आयटीएस) टोल मॅनेजमेंट सिस्टीम, इलेक्टिकल कामे, हायवे आणि ब्रिज ट्रीटलाइटिंग सिस्टम, टोल प्लाझाचे बांधकाम आणि कमांड कंट्रोल सेंटरसह प्रशासकीय इमारतींच्या रचना पुरवठा, स्थापना आदी विविध कामांकरिता ४२७ कोटींच्या कामाला समितीने मंजुरी दिली आहे.

Web Title: Permission Granted For Eleven Hundred Crore Mmrda Work Mumbai News Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Metro Projectmmrda