राज ठाकरेंच्या मुंबईतील सभेला परवानगी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

राज यांच्या सभेसाठी मनसेने मुंबई महापालिका आणि निवडणूक आयोगाकडे सभेची परवानगी मागितली होती. मात्र महापालिकेने या सभेची परवानगी नाकारली होती. त्याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर आज निवडणूक आयोग आणि महापालिकेने राज यांच्या सभेला परवानगी दिली.

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घणाघाती सभांनी हैराण झाल्यानंतर देखील त्यांच्या सभांना परवानगी देण्याची वेळ भाजपवर आली. 23 एप्रिल रोजी काळाचौकी येथे राज यांची जाहीर सभा होणार असून, मुंबईतल्या सभेत राज यांचा निशाणा कोणावर असेल, याबाबत उत्सुकता आहे. 

राज यांच्या सभेसाठी मनसेने मुंबई महापालिका आणि निवडणूक आयोगाकडे सभेची परवानगी मागितली होती. मात्र महापालिकेने या सभेची परवानगी नाकारली होती. त्याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर आज निवडणूक आयोग आणि महापालिकेने राज यांच्या सभेला परवानगी दिली. मनसेने 24 एप्रिल रोजी सभेची परवानगी मागितली होती. मात्र त्यांना 24 एप्रिलऐवजी एक दिवस आधी 23 एप्रिलची परवानगी मिळाल्याने 23 एप्रिल रोजी राज यांची सभा काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदानात होणार आहे.

Web Title: The permission for Raj Thackeray meeting in Mumbai