esakal | आरेतील वृक्षतोडविरोधात उच्च न्यायालयात याचिका
sakal

बोलून बातमी शोधा

आरेतील वृक्षतोडविरोधात उच्च न्यायालयात याचिका

मेट्रो कारशेडसाठी आरे वसाहतीतील तब्बल अडीच हजारांहून अधिक झाडांची कटाई करण्याच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयाविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली.

आरेतील वृक्षतोडविरोधात उच्च न्यायालयात याचिका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मेट्रो कारशेडसाठी आरे वसाहतीतील तब्बल अडीच हजारांहून अधिक झाडांची कटाई करण्याच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयाविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली. या याचिकेवर बुधवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे.

पर्यावरणप्रेमी झोरु बथेना यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महापालिकेने मेट्रोच्या कारशेडसाठी आरे वसाहतीमध्ये जागा निश्‍चित केली आहे. कारशेडच्या बांधकामासाठी तेथील एकूण 2702 झाडांची कटाई करायची आहे. यापैकी 2646 जुनी, दुर्मिळ झाडे कापण्याची परवानगी मुंबई महापालिकेने चार दिवसांपूर्वी एका ठरावाद्वारे दिली आहे. ही परवानगी रद्द करण्याची मागणी याचिकादारांनी केली आहे.

आरेतील झाडे वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमीनी आंदोलनही सुरू केले आहे. महापालिकेने झाडे कटाईबाबत जूनमध्ये जाहीर नोटीस दिली होती. त्यावेळेस याचिकादारासह शेकडो नागरिकांनी आणि पर्यावरण संस्थांनी झाडे कटाईबाबत लेखी हरकती दाखल केल्या होत्या. असे असतानाही याबाबत महापालिकेने नियमांचे उल्लंघन करुन निर्णय घेतला असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये पाच तज्ज्ञ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी काही सदस्यांनीही या सरसकट कटाईला विरोध केला होता. त्यामुळे जेव्हा झाडे कापण्याचा निर्णय झाला तेव्हा हा विरोध न करण्याचे स्पष्टीकरण देणेही सदस्यांसाठी बंधनकारक आहे. मात्र, त्याबाबत कोणताही खुलासा समितीकडून करण्यात आला नाही, असे याचिकादाराचे म्हणणे आहे.

loading image
go to top