महावितरण भरतीतील नियुक्ती पत्र न मिळालेल्या उमेदवारांची उच्च न्यायालयात याचिका

सुनिता महामुणकर
Friday, 18 December 2020

महावितरणमधील उपकेंद्र सहाय्यक आणि तंत्रज्ञ पदासाठीची परीक्षा मराठा आरक्षणाअंतर्गत उत्तीर्ण झालेल्या पण नियुक्ती पत्र न मिळालेल्या उमेदवारांनी आता उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

मुंबई  : महावितरणमधील उपकेंद्र सहाय्यक आणि तंत्रज्ञ पदासाठीची परीक्षा मराठा आरक्षणाअंतर्गत उत्तीर्ण झालेल्या पण नियुक्ती पत्र न मिळालेल्या उमेदवारांनी आता उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याचिकेवर शुक्रवारी न्या के के तातेड आणि न्या एन आर बोरकर यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी झाली. महानिर्मिती आणि महावितरणने याचिकेच्या आधीन राहून अन्य प्रवर्गातील नियुक्त्या कराव्यात, असे आदेश खंडपीठाने दिले आहेत. महावितरण आणि महानिर्मितीच्या वतीने तंत्रज्ञ 3 आणि उपकेंद्र सहाय्यक पदासाठी मागील वर्षी जाहिरात मागविली होती. यामध्ये नितीन म्हस्के व अन्य पाचजणांनी तंत्रज्ञ तर कैलास तांबडे व अन्य उमेदवारांनी मराठा आरक्षणाअंतर्गत एसईबीसी सामाजिक आर्थिक मागासवर्गीय गटातून अर्ज दाखल केले होते. परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर त्यांची नावे निवड यादीत दर्शविण्यात आली आणि पुढील प्रक्रिया सुरू झाली. मात्र कोरोना संसर्गामुळे त्यांना नियुक्ती पत्रे दिली नाही. याच दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली.

पीओपी वापराबाबत अभ्यास गट स्थापन करणार; केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची शिष्टमंडळाला ग्वाही

त्यामुळे या उमेदवारांना डावलून अन्य मागास प्रवर्गातील भरती महावितरण ने सुरु केली. त्यामुळे सर्व संबंधित उमेदवारांनी एड विनोद सांगवीकर आणि एड अमोल चाळक पाटील यांच्या मा्फत याचिका दाखल केली. याचिकेची दखल खंडपीठाने घेतली असून महावितरणला आणि महानिर्मितीला नोटीस बजावली आहे. तसेच अन्य प्रवर्गातील भरती केली असल्यास ही भरती न्यायालयात दाखल याचिकेच्या अंतिम निर्णयावर आधीन असतील, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.

Petition of High Court candidates who have not received appointment letter in msedcl recruitment

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petition of High Court candidates who have not received appointment letter in msedcl recruitment