esakal | Petrol price | मुंबईत पुन्हा इंधनाची दरवाढ; राज्यातील सर्व जिल्ह्यात पेट्रोल 95 पार

बोलून बातमी शोधा

Petrol price | मुंबईत पुन्हा इंधनाची दरवाढ; राज्यातील सर्व जिल्ह्यात पेट्रोल 95 पार}

मुंबईत पेट्रोल 23 तर डिझेल 16 पैशांनी पुन्हा महागले आहे. तर राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्येही वाढ होऊन पेट्रोलच्या दरांनी 95 रूपयांचा आकडा कधीच पार केला आहे.

Petrol price | मुंबईत पुन्हा इंधनाची दरवाढ; राज्यातील सर्व जिल्ह्यात पेट्रोल 95 पार
sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई - बुधवार पासून तिन दिवस स्थिर असलेले इंधनाचे दर शनिवारी पुन्हा वाढले. यामध्ये मुंबईत पेट्रोल 23 तर डिझेल 16 पैशांनी पुन्हा महागले आहे. तर राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्येही वाढ होऊन पेट्रोलच्या दरांनी 95 रूपयांचा आकडा कधीच पार केला आहे. तर गडचिरोली, नांदेड, परभणी या ठिकाणी मात्र, पेट्रोल तब्बल 99 रुपये प्रती लिटर विक्री सुरू आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे दर घटल्यानंतर, कोरोनाच्या महामारीमूळे देशातील नागरिकांना इंधनाच्या दरात घट होऊन दिलासा मिळणार अशी अपेक्षा होती. मात्र, त्याउलट इंधनाच्या दराने भडका घेतला आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या अधिभार आणि विविध करामूळे इंधन कंपन्या पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ करत असल्याने, पेट्रोलचे दर शंभरी गाठण्याच्या मार्गावर आहे. सध्या मुंबईत पेट्रोल 97.57 रूपये तर डिझेल 88.60 रूपये प्रति किलोमीटर विकल्या जात आहे. 

मुंबई, पालघर, रायगड, ठाणे परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यात सध्या सर्वाधीक महाग पेट्रोल परभणी मध्ये 99.68 प्रती लिटर पेट्रोलचे दर आहे. तर त्याखालोखाल गडचिरोली आणि नांदेड जिल्ह्यात सुद्धा 99 रुपयांपेक्षा जास्त पेट्रोल दर आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा हळुहळू पेट्रोलच्या दराचा भडका उडायला सुरूवात झाली आहे. 

जयपुरनंतर मुंबई महाग 
देशभरातील महानगरांमध्ये पेट्रोल च्या दराची तुलना केल्यास जयपुर मध्ये 97.88 रूपये प्रतीलिटर पेट्रोलचे दर आहे. त्याबरोबर मुंबईत 97.57 रूपये पेट्रोलचे दर पोहचले, त्यानंतर नवी दिल्ली 91.17, कोलकात्ता 91.35, चेन्नई 93.11,गुडगाव 88.75, नोयडा 89.28, बॅगरूळू 94.22, भुवनेश्वर 91.86. चंदिगढ 87.73, हैद्राबाद 94.79, लखनऊ 89.31,पटना 93.53, तिरूवनंतपुरम 93.05

--------------------------

( Edited by Tushar sonawane )

petrol price Fuel price hike in Mumbai again Petrol crosses 95 in all districts of the state