
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच मुंबईकरांची सरसकट लोकल प्रवासी सेवा बंद आहे. त्यामध्ये दुसरीकडे इंधन दरवाढ कायम असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच मुंबईकरांची सरसकट लोकल प्रवासी सेवा बंद आहे. त्यामध्ये दुसरीकडे इंधन दरवाढ कायम असल्याचे दिसून येत आहे. महिन्याभऱ्यापासून इंधनाचे दर अस्थिर असून, गेल्या दोन दिवसात सातत्याने दर वाढल्याने मुंबईत पेट्रोलचा, डिझेल उच्चांक गाठला आहे. पेट्रोल मध्ये 58 पैसे आणि डिझेल मध्ये 64 पैशाने वाढ झाली आहे. ही दरवाढ अशीच कायम राहिल्यास काहीच दिवसात मुंबईत पेट्रोल शंभरी पार करण्याची शक्यता आहे.
मंगळवारी प्रजासत्ताक दिनीच इंधन कंपन्यांचे पुन्हा
33 ते 34 पैशाने दरवाढ झाले. त्यानंतर बुधवारी सुद्धा ही दरवाढ कायम आहे. गेल्या महिन्याभरात पाच वेळा इंधनाचे दर वाढले, त्यानंतर ही सहावी दरवाढ आहे. मंगळवारी पेट्रोल 34 तर डिझेल 37 पैशांची वाढ झाली तर बुधवारी पेट्रोल मध्ये 24 पैसे तर डिझेलचे 27 पैशाने दरवाढ झाल्याने मुंबईकरांना आता प्रतिलिटर पेट्रोल 92.86 रुपये तर डिझेल 83.30 रुपयांमध्ये विकत घ्यावे लागणार आहे.
यापूर्वी 18,19 जानेवारी रोजी पेट्रोलच्या दरात तब्बल 48 पैसे तर डिझेल दरामध्ये 53 पैशांची वाढ झाली. तर 20,21 जानेवारी दोन दिवस दर स्थिर होते. त्यानंतर पुन्हा 22,23 जानेवारी या दोन दिवसांमध्ये पेट्रोल पुन्हा 48 पैसे आणि 53 पैशाने डिझेल वाढले. त्यानंतर दर स्थिर झाल्यानंतर, 26 जानेवारी पासून पुन्हा आता दरवाढ सुरू झाली आहे. त्यामुळे 18 जानेवारी पुर्वी असलेले पेट्रोलचे 91.32 रुपयांमध्ये 1.54 रुपये वाढले आहे. तर डिझेलचे 81.6 रुपयांमध्ये तब्बल 2.24 रुपये वाढल्याने, मुंबईकरांचा वाहन प्रवास आता चांगलाच महागण्याची शक्यता आहे.
राज्यातील जिल्ह्याचे दर (प्रति लिटर)
जिल्हे - पेट्रोल - डिझेल
अमरावती - 94.29 - 84.76
बीड - 94.49 - 83.63
गोंदिया - 94.4 - 83.21
मुंबई उपनगर - 93.2 - 83.45
नांदेड - 94.84 - 83.98
जालना - 83.10 - 83.10
परभणी - 94.52 - 83.64
रत्नागिरी - 94.27 - 83.40
सिंधुदुर्ग - 94.40 - 83.55
----------
देशातील महानगरातील इंधनाचे दर
मुंबईतील पेट्रोलचा दर 92.86 रूपये आहे. त्याप्रमाणे चेन्नई 94.30, दिल्ली 86.30, कोलकात्ता 87.69, बंगळुरू 94.50, चंदीगड 83.9 रूपये तर झिझेलच्या दरांमध्ये मुंबई 83.30 रूपये, त्याप्रमाणे चेन्नई 82.30, दिल्ली 76.48, कोलकाता 80.8, बंगळुरू 82.00, चंदीगड 76.23 रूपये दर होते.
---------------
नांदेड मध्ये पेट्रोल तर अमरावती मध्ये डिझेलच्या दराचा भडका
बुधवारी राज्यभरात सर्वाधिक पेट्रोलचा दर नांदेड जिल्ह्यात असून 94.84 रुपयांवर पोहचले आहे. तर डिझेल सर्वाधिक अमरावती मध्ये महागडे झाले असून, 84.76 रुपयांवर पोहचले आहे. भविष्यात इंधनामध्ये आणखी दरवाढ होऊन सर्वसामान्यांचा प्रवास आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
Petrol price hike Fuel price hike sustained Petrol-diesel explosion again in two days
------------------------------------------------