खड्ड्याने घेतला 26 वर्षीय तरुणाचा जीव

बदलापूर रोडवरील दुर्दैवी घटना
Pit claimed life of 26 year old youth On Badlapur Road vk11
Pit claimed life of 26 year old youth On Badlapur Road vk11
Updated on

डोंबिवली - काटई बदलापूर रोडवर काही ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले असून शनिवारी एका 26 वर्षीय तरुणाचा जीव या खड्ड्यांमुळे गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अंकित थैवा (वय 26) असे मृत तरुणाचे नाव आहे. कामावर जाण्यासाठी अंकित अंबरनाथ येथून निघाला असता खोणी म्हाडा वसाहती जवळील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात त्याच्या दुचाकीचा तोल गेला. तोल गेल्याने बाजूने जाणाऱ्या केडीएमटी बसची त्याला जोरात धडक बसली यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात केडीएमटी बसचालका विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अंबरनाथ मधील आनंदनगर येथे अंकीत थैवा हा आपल्या परिवारासह रहात होता. नवी मुंबईतील घणसोली येथील केअर फार्मा कंपनीत गेल्या दोन वर्षांपासून तो नोकरी करत होता. अंकीतचे वडील रामकुमार हे अंबरनाथ एमआयडीसी मधील व्हिर्टिव्ह कंपनीत चालकाची नोकरी करतात. रामकुमार यांचा अंकित हा मोठा मुलगा होता.

दररोज सकाळी तो 8 वाजता घर सोडत असे तर सायंकाळी 7 ला घरी येत असे. शनिवारी नेहमी प्रमाणे ऍक्टिव्हा गाडी वरून कामावर जाण्यासाठी निघाला. बदलापुर रोडने काटई सर्कलकडे जात असताना खोणी म्हाडा वसाहत येथे तो आला असता रस्त्याच्या मधोमध असणा-या खडयात त्याची गाडी आदळली. त्यात त्याचा तोल जावुन त्याच्या बाजुने चाललेल्या केडीएमटीच्या पनवेल बसची पाठीमागील बाजुस तो जोरात धडकला. यात तो गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाला. त्याला शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला 12.30 वाजता मयत घोषित केले.

याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून अंकित याचे वडील रामकुमार यांच्या तक्रारीवरून केडीएमटी बसचालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकीतचा मृत्यू झाल्यानंतर त्वरित हा खड्डा येथील समाजसेवक कुणाल पाटील यांनी सिमेंट ने बुजविला आहे. मात्र रस्त्यांची स्थिती कधी सुधारणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान कल्याण डोंबिवलीसह कल्याण शीळ रोड, बदलापूर काटई रोड, दावडी रोड आदी रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. पावसाच्या पाण्यात यांचा अंदाज येत नसल्याने वाहनांचे अपघात येते होत आहेत. आता तर 26 वर्षीय तरुणाला खड्ड्यांमुळे आपला जीव गमवावा लागला असून प्रशासन आता तरी हे खड्डे गांभीर्याने घेणार का ? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com