मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदींमध्ये फोनवरुन चर्चा

कुठल्या विषयावर दोघांमध्ये बोलणे झाले?
Uddhav Thackeray and PM Modi
Uddhav Thackeray and PM ModiGoogle file photo

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यामध्ये फोनवरुन (phone call)चर्चा झाली आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षणा संदर्भातील कायदा तीन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. त्यावेळी राज्य सरकारने मराठा आरक्षण हा केंद्राच्या अखत्यारितील विषय असून आपण मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतही चर्चा करण्यास तयार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. (PM Narendra Modi spoke to Maharashtra CM Uddhav Thackeray on the COVID-19 related situation in the state)

दरम्यान आता मंत्रिमंडळाच्या उपसमितीची मराठा आरक्षणासंदर्भात मुंबईत बैठक सुरु आहे. मंत्री अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि आशुतोष कुंभकोणी या बैठकीला उपस्थित आहेत. आज उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये फोनवरुन झालेली राज्यातील कोरोना स्थितीसंदर्भात होती.

Uddhav Thackeray and PM Modi
बदलापूरमध्ये आजपासून कडक लॉकडाउन

राज्यात कोरोनाची स्थिती हळूहळू नियंत्रणात येतेय. मुंबईसह महत्त्वाच्या शहरांमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. केंद्राने कोरोना स्थिती हाताळण्यासाठी मदतीचे आश्वासन दिले आहे. पण अजूनही ऑक्सिजन, रेमडेसिव्हीरच्या पुरवठ्याबद्दल काही तक्रारी आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com