घोटाळेबाजांना साफ करणार! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बिल्डरांना इशारा 

घोटाळेबाजांना साफ करणार! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बिल्डरांना इशारा 

नवी मुंबई, ता. 16 : बांधकाम क्षेत्र हे घर निर्मिती व रोजगाराचे सशक्त माध्यम म्हणून उभे रहात आहे. मात्र शेतकऱ्यांची जमिनी व सामान्यांची घरे अनेक बांधकाम माफिया लुबाडत आहेत. या माफियांना साफ करू अशा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोटाळेबाज बिल्डरांना दिला आहे. झोपडपट्टीधारकांसाठी घरे, किनारपट्टीचा विकास, मच्छिमारांसाठी केंद्रात स्वतंत्र विभाग आदी सामान्यांच्या मुद्‌द्‌याला मोदींनी यावेळी हात घालत पुन्हा विकास करणारे सरकार निवडून द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केली. विधानसभा निवडणुकीत डोंबिवली, ऐरोली, बेलापूर, पनवेल आणि पेणच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खारघर येथे आयोजित सभेत मोदी बोलत होते. 

रेरा कायद्यावर बोलताना मोदींनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर सडकून टीका केली. स्वतःची दुकाने बंद पडणार असल्याने रेरा कायद्याच्या मागणीला कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने विरोध केला होता. 2014च्या आधी बांधकाम क्षेत्रातील बिल्डर आणि अंडरवर्ल्डच्या गुंडांचे संबंध सर्वांना माहीत आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस हे काळे डाग धुवण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे टीकास्त्र मोदींनी आघाडी सरकारवर डागले. ग्राहक आणि शेतकरी यांच्यासोबत जो विकासक प्रामाणिक राहील त्याच्यापाठीमागे सरकार भक्कमपणे उभे राहील असे आश्‍वासन मोदी यांनी यावेळी विकासकांना दिले. 

सर्वसामान्यांप्रमाणे झोपडपट्टीधारकांनाही सरकारतर्फे घरे मिळणार आहेत. पनवेलजवळ तयार होणारी दोन लाख घरांचे झोपडपट्टीधारकांना वाटप केले जाणार असल्याची घोषणा मोदींनी केली. भाजपचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर, मंदा म्हात्रे, रविंद्र चव्हाण, गणेश नाईक व रविंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी खारघर येथे मैदानवर भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. पेण, पनवेल, बेलापूर, ऐरोली आणि डोंबिवली या भागात येणाऱ्या विविध प्रकल्पांमुळे भविष्यात ही ठिकाणे उर्जास्थाने होणार आहेत. त्यामुळे येथील उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन मोदी यांनी केले. 


फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री 
विधानसभा निवडणूकांनंतर राज्याच्या मुख्यमंत्री पदाची माळ पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडणार असल्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत दिले. दिल्लीत ज्या प्रमाणे तुम्ही नरेंद्रला बसवलेत, त्याप्रमाणे मुंबईत देवेंद्रला बसवा असे बोलून मोदींनी फडणवीस यांच्या पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसवणार असल्याचे सूतोवाच यावेळी दिले. नरेंद्र आणि देवेंद्र हा फॉर्म्युला गेल्या पाच वर्षांत सुपहीट ठरला असून हे डबल इंजिन राज्याच्या विकासाची खरी ताकद बनेल असेही मोदी यावेळी म्हणाले. 

परदेशी गुंतवणूकीचा महाराष्ट्राला सर्वाधिक लाभ 
गेल्या पाच वर्षात देशाची अर्थव्यवस्था अधिक भक्कम झाली आहे. देशात परदेशी गुंतवणूक वाढलेली आहे. या परदेशी गुंतवणूकीपैकी 100 लाख कोटी रुपयांच्या गुतंवणुकीचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला होणार आहे.

WebTitle : pm narendra modi targets fraud builders in his kharghar public speech 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com