पीएमसी बँक गैरव्यवहार | प्रवीण राऊतांशी संबंधीत 72 कोटींच्या मालमत्तेवर टाच

पीएमसी बँक गैरव्यवहार | प्रवीण राऊतांशी संबंधीत 72 कोटींच्या मालमत्तेवर टाच

मुंबई - पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय ( enforcement directorate ) ने मोठी कारवाई केली आहे.  ईडीने पीएमसी बँक गैरव्यवहार आरोपी प्रवीण राऊत यांच्याशी संबंधीत 72 कोटींची मालमत्तेवर टाच आणली आहे. याच प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले होते.

पीएमसी बँक गैरव्यवहार  प्रकरणात आरोपी प्रवीण राऊत यांच्या संशयित बँक व्यवहार आहेत त्यांची पडताळणी ईडी करत आहेत. पीएमसी बँक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीकडून काहीजणांची चौकशी सुरू आहे. याच प्रकरणी वर्षा राऊत यांनाही समन्स पाठवण्यात आला होता. त्या चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी त्यांनी काही अवधीची मागणी केली आहे.  त्यामुळे आताही 5 जानेवारीला ही चौकशी होणार आहे.
 महाविकासआघाडीच्या नेत्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलेलं आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यानंतर नुकतीच, भोसरीतील भूखंडाच्या व्यवहारासंदर्भात ईडीने माजी मंत्री  आणि राष्टवादीचे नेते एकनाथ खडसे यांना समन्स बजावले होते.

PMC Bank issue on Confiscated assets worth Rs 72 crore related to Praveen Raut

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com