
पाली : राहत्या घरामध्ये स्वामी समर्थांची पावले उमटल्याचा तसेच स्वामी समर्थांच्या पोथीमधून मोठया प्रमाणात अंगारा-विभुती निघत असल्याचा दावा करुन समाजात अंधश्रद्धा पसरवणाऱ्या महिलेविरोधात पनवेल शहर पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्यानुसार नुकताच गुन्हा दाखल करुन पुढील तपासाला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी या महिलेच्या कथित चमत्कारावर आक्षेप घेऊन तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी नुकतीच ही कारवाई केली.