BMC
BMCsakal media

रस्त्यावरील राडारोडा न हटल्यास पोलीस कारवाई करा; BMC आयुक्तांचे आदेश

मुंबई : रस्त्यावर खोदकाम केल्यानंतर त्याचा राडारोडा न हटवल्यास (Garbage on road) संबंधितांवर थेट पोलीस कारवाई (Police action) करण्याचे निर्देश महापालिकेचे प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल (dr iqbal singh chahal) यांनी दिले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आज चहल यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांसह सर्व प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत पालिकेसह सर्व प्राधिकरणांची कामे १५ मेपर्यंत पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी रस्ते-मॅनहोल सुरक्षित करावे, असे आदेश चहल यांनी दिले.

BMC
ठाणे पालिकेचे सुविधा भूखंड वाटप चौकशीच्या घेऱ्यात; नगरविकास मंत्र्यांची घोषणा

पोलिस, रेल्वे, म्हाडा, एमएमआरडीएसह विविध प्राधिकरणांचे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चहल यांनी विविध कामांचा आढावा घेतला. पालिकेसोबत योग्य समन्वय साधून यंत्रणांनी काम करावे, असे आदेश चहल यांनी दिले. या वेळी अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, पी. वेलरासू, संजीव कुमार, डॉ. संजीव कुमार, ‘बेस्ट’ महाव्यवस्थापक लोकेश चंद्र सहआयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, खातेप्रमुख आदी उपस्थित होते.

मुंबईत विविध सेवा देणाऱ्या संस्थांकडून कामे करताना उघड्यावर बेकायदेशीरपणे राडारोडा टाकला जातो. त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका आहे. वेळेत राडारोडा न हटवल्यास संबंधितांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करा, असे निर्देशही या वेळी आयुक्तांनी दिले.

BMC
कनेक्टिंग डॉट्स : महामारीसोबत जगणे शिकायला हवे!

पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करा

- पाणी साचणाऱ्या ठिकाणी सुरू असलेल्या कामांचा आढावा घ्यावा. पाणी उपसणारे पंप योग्य वेळी तैनात करून ठेवा.
- मॅनहोलची पाहणी करून गरजेनुसार झाकणे बदलून घ्यावीत.
- नालेसफाई चोख करून घ्यावी.
- उद्यान खात्याने धोकादायक झाडांच्या फाद्यांची छाटणी करावी
- पावसाळ्यासाठी ‘बेस्ट’ची संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवावी
- धोकादायक दरडी, इमारतींबाबत आवश्यक कार्यवाही
- साथरोगांच्या पार्श्वभूमीवर वेगाने नियोजनाने काम
- आपत्कालीन विभागाने हवामान खात्याशी समन्वयाने काम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com