esakal | रेमडेसिवीर, टोसीलीझुमॅब औषधांचा काळाबाजार करणाऱ्या 5 जणांना अटक; आरोपींकडे आढळली गर्भपाताचीही औषधे...
sakal

बोलून बातमी शोधा

रेमडेसिवीर, टोसीलीझुमॅब औषधांचा काळाबाजार करणाऱ्या 5 जणांना अटक; आरोपींकडे आढळली गर्भपाताचीही औषधे...

मंगळवारी (ता. 21) ठाण्यातील नौपाडा परिसरात ही दोन्ही औषध अवैधरित्या अधिक किंमतीने विक्री करण्यासाठी काहीजण येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकातील अधिकाऱ्यांना आणि अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

रेमडेसिवीर, टोसीलीझुमॅब औषधांचा काळाबाजार करणाऱ्या 5 जणांना अटक; आरोपींकडे आढळली गर्भपाताचीही औषधे...

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : सध्या संपूर्ण जगात कोरोनाचा उद्रेक होत असताना त्यावर उपयुक्त ठरणाऱ्या रेमडेसेवीर आणि टोसीलीझुमॅब या औषधांचा अजूनही बाजारात तुटवडा आहे. मात्र, या स्थितीतही या दोन्ही औषधांचा काळा बाजार सुरू असून ठाण्यात याबाबतची मोठी कारवाई करण्यात आली. या औषधांचा काळाबाजार करणाऱ्या 5 जणांच्या टोळीला ठाणे खंडणी विरोधी पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेतले. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने हा सापळा रचण्यात आला असून ठाणे पोलिस तपास करत आहेत.

ब्राझीलच्या विनंतीनंतर ईडीची भारतात मोठी कारवाई; मुंबईचे सुद्धा आहे कनेक्शन...

मंगळवारी (ता. 21) ठाण्यातील नौपाडा परिसरात ही दोन्ही औषध अवैधरित्या अधिक किंमतीने विक्री करण्यासाठी काहीजण येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकातील अधिकाऱ्यांना आणि अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार, या दोन्ही पथकांनी सापळा रचून या परिसरातून तीन व्यक्तींना ताब्यात घेतले. 

पोटगीची रक्कम थकवणाऱ्या नवऱ्याला न्यायालयाचा दणका; मालमत्ता गोठवण्याचे दिले आदेश

त्यांच्याकडे रेमडेसिवीर आणि टोसीलीझुमॅब या औषधांसह कर्करोग आणि गर्भपाताचीही औषधे होती. परिसरात रेमडेसिवीर आणि टोसीलीझुमॅब ही औषधे मूळ किंमतीपेक्षा अधिक किंमतीने अनुक्रमे 25 हजार आणि 80 हजार रुपयांनी ते विकत होते. त्याचवेळी पथकांनी  धाड टाकून त्यांना औषधांसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून औषधांसह गुन्ह्यात वापरलेली कार आणि मोबाईल असा एकूण 5,18,500 रुपयांच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी 5 जणांना ताब्यात घेतले असून या सर्वांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम, औषध व सौदर्य प्रसाधन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास खंडणी विरोधी पथक करत आहे. 

ब्राझीलच्या विनंतीनंतर ईडीची भारतात मोठी कारवाई; मुंबईचे सुद्धा आहे कनेक्शन...

असा प्रकार आढळल्यास संपर्क करा
औषधांचा असा काळाबाजार आपल्या निदर्शनास आला असेल किंवा आफली फसवणूक होत असेल तर तक्रारीसाठी खंडणी विरोधी पथक यांच्या 022- 25348336 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
---
संपादन : ऋषिराज तायडे
 

loading image