मनोर : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी गजाआड | Manor crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sexual assault

मनोर : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी गजाआड

मनोर : मनोरमधील नवी दापचरी गावातील तरुणीवर अल्पवयीन असताना तिच्या शिक्षणास मदत आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लग्नाचे प्रलोभन दाखवून (Marriage decoy) दोन वर्षांपासून शारीरिक अत्याचार (sexual assault) करणाऱ्या तरुणावर मनोर पोलिस ठाण्यात (Manor Police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आरोपीने तिला जीवे ठार मारण्याची (killing threat) धमकी देत लग्नास नकार दिला होता. त्यानुसार पोलिसांनी सुनील कारेला (culprit arrested) याला अटक केली आहे.

हेही वाचा: कर्जत : बैलगाडी शर्यतीत दौलत देशमुख यांचा मृत्यू; आयोजकांवर गुन्हा दाखल

पीडित तरुणी अल्पवयीन असताना, सुनीलने तिला शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत देण्याच्या बहाण्याने तिच्यासोबत जवळीक वाढवली होती. तिचा विश्वास संपादन करत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लग्नाचे आश्वासन देत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पीडितेने लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्नास नकार देत शिवीगाळ केली होती. तसेच ठार मारण्याची धमकी दिली होती. सुनीलने रागाच्या भरात पीडितेला तिच्या मामाच्या घरीही नेऊन ठेवले होते.

त्याचा राग शांत झाल्यानंतर तो तिला घरी घेऊन जाऊन लग्न करेल, या आशेने पीडितेने सुनीलविरोधात तक्रार दिली नव्हती. अनेक दिवस वाट पाहूनही सुनील लग्न करीत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने मनोर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सुनील कारेला याच्याविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

Web Title: Police Arrested Culprit Sunil Kare In Minor Girl Sexual Assault Crime Manor News Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top