प्रिन्सी तिवारी हत्येच्या तपासासाठी मदत करणारांचा पोलिसांकडून सत्कार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

कल्याणमधील प्रिन्सी तिवारी ऑनर किलिंग प्रकरणात पोलिसांना तपासासाठी मदत करणाऱ्यांचा पोलिसांच्या वतीने आज सत्कार करण्यात आला.

कल्याण :  प्रिन्सी तिवारी ऑनर किलिंग प्रकरणात पोलिसांना तपासासाठी मदत करणाऱ्यांचा पोलिसांच्या वतीने आज सत्कार करण्यात आला. पोलिस तपासात नागरिक, शाळकरी मुलगी यांनी दिलेली माहिती, तसेच रिक्षाचालकांनी केलेल्या सहकार्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले. रिक्षाचालक महंमद मोमीन, सलिम खान आणि मृतदेह उचलणारा दिलावर यांचा पोलिसांनी जाहीर सत्कार केला. तसेच गुन्हा घडत असेल तर निःसंकोच पोलिसांना कळवावे, असे आवाहन या वेळी पूर्व प्रादेशिक विभाग अप्पर आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी पत्रकार परिषदेत केले. 

ही बातमी बाचा ः आधी तिला सॅनिटायझर पाजलं मग टाॅयलेटमध्ये नेऊन केल...
ऑनर किलिंगप्रकरणी माहिती देण्यासाठी शुक्रवारी (ता.१३) पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलिस उपायुक्त विवेक पानसरे, सहायक पोलिस आयुक्त अनिल पोवार, पोलिस निरीक्षक प्रकाश लोंढे, पोलिस निरीक्षक संभाजी जाधव आदी उपस्थित होते.

अशी केली हत्या
अरविंद तिवारी याने मुलीची गुरुवारी (ता.५) घरातच झोपल्यानंतर गळा दाबून हत्या केली. त्यानंतर शुक्रवारी त्याने कल्याणमधून १५० रुपयांचा चाकू खरेदी केला आणि मयत प्रिन्सीचा मृतदेह घरातील बाथरूममध्ये नेऊन तिचे तीन भाग केले. त्यानंतर घर बंद करून आरोपी बाजूच्या खोलीत झोपण्यास गेला. दरम्यान, शेजाराऱ्यांनी त्याला मुलीबाबत विचारले असता मुलीला गावाला पाठविले असल्याचे खोटे सांगितले. त्यानंतर शनिवारी ११ वाजता प्रिन्सीचे धड आणि डोके कल्याण खाडीत फेकले आणि रविवारी (ता.८) पहाटे कल्याण येथून अर्धवट मृतदेह फेकण्याच्या उद्देशाने निघाला असताना रिक्षाचालक महंमद मोमीन आणि सलिम खान या रिक्षाचालकांच्या सतर्कतेमुळे आरोपी कल्याणमध्ये अर्धवट मृतदेह टाकून पसार झाला. 

डोक्‍याचा शोध सुरूच
पोलिसांना कडूम मृतदेहाच्या डोक्‍याचा अद्याप शोध सुरू आहे. रविवारपासून तीन ते पाच अधिकारी आणि दहा कर्मचारी या तपासकामात जुंपले असून सहा दिवस ते घरीही गेले नाहीत. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सत्काराबाबत वरिष्ठ पातळीवर शिफारस केल्याची माहिती अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police to assist in investigation of murder of Prince Tiwari ; Honor Killing Case in Kalyan